नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आतंकवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती पुढे येत आहे. जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी संघटनेच्या एका अतिरेक्याने नागपूरमधील संघ मुख्यालय आणि हेडगेवार भवन या दोन्ही ठिकाणांची रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित काही अतिरेकी नागपूर मध्ये आले होते. त्यांच्या या नागपूर भेटी मागचा मुख्य हेतू संघ मुख्यालय, हेडगेवार भवन तसेच नागपूर शहरातील इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करण्याचा होता. या माहितीनंतर या सर्व स्थळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांशी बोलताना त्यासंबंधीची माहिती दिली.
हे ही वाचा:
मालवणीमध्ये बांग्लादेशी महिलेने थाटला ड्रग्सचा व्यापार
महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा
मराठीतून शिक्षण घेतलेल्या १५० उमेदवारांना तात्काळ शिक्षकपदी नियुक्त करा!
प्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!
श्रीनगर मधून अतिरेकी नागपूर मध्ये आले होते महिनाभरापूर्वी हे अतिरेकी नागपूर मध्ये येऊन गेल्याची माहिती पोलिसांमधील सूत्रांनी माध्यमांशी बोलताना दिली. यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून नागपूर क्राईम ब्रँच मार्फत या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय हे भारतातील काही संवेदनशील ठिकाणांपैकी एक मानले जाते. जगातली सर्वात मोठी बैल राज्य संघटना अशी ओळख असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूर येथे झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांचा निवासही नागपूर येथील याच संघ मुख्यालयात असतो. त्यामुळे तिथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि देशातील शांतता भंग होऊ नये यासाठी सुरक्षा यंत्रणा कायमच सतर्क असतात.