हैदराबाद शहरातील गचिबोवली परिसरात पोलिसांकडून ५ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.हैदराबादमध्ये पोलिसांकडून गुरुवारी ठीक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.नाकाबंदी दरम्यान पोलीस वाहनांची तपासणी करत असताना एका कारमधून तब्बल ५ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड पोलिसांच्या हाती लागली आहे.रोकड वाहतूक करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली ही रक्कम पुढील तपासासाठी आयकर विभागाच्या अधिकार्यांकडे सोपवण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.हैदराबाद शहरातील गचिबोवली परिसरात करण्यात आलेल्या नाकाबंदीच्या तपासणी दरम्यान पोलिसांनी एका कारमधून ५ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली.तसेच हैदराबादमधील हयातनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या परिसरात गुरुवारी नाकाबंदीच्या तपासणी दरम्यान पोलिसांनी एका कारमधून २ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
हे ही वाचा:
रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती!
“एक मिलियन डॉलर बिटकॉईन द्या, नाहीतर टर्मिनल २ उडवणार” मुंबई विमानतळाला धमकीचा ईमेल
सचिन वाझेला तुरुंगात हवेय मांजराचे पिल्लू
आठ माजी नौदल कर्मचाऱ्यांच्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधातील भारताचे अपील कतारने स्वीकारले!
दरम्यान, तेलंगणात विधानसभा निवडणुकीला एक आठवडा असल्याने पोलिसांनी राज्यभरात सतर्कता वाढवली आहे. ९ ऑक्टोबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आल्यापासून पोलिसांनी वाहनांच्या तपासणीला वेग दिला आहे.भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनुसार रोख वाहतूक करणे हा दंडनीय गुन्हा आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी ECI ने नमूद केले आहे की, सर्व पक्षाच्या उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या भ्रष्ट पद्धतीच्या वापर करू नये.जसे की, मतदारांना लाच देणे, मतदारांना धमकावणे, मतदारांची तोतयागिरी करणे, प्रचार करणे अशा सर्व गोष्टी काळजीपूर्वक टाळल्या पाहिजेत अन्यथा निवडणूक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात येईल.