29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरक्राईमनामाअपघातानंतर अपंगत्व आलेल्या तरुणाला मिळाली दीड कोटीची भरपाई !

अपघातानंतर अपंगत्व आलेल्या तरुणाला मिळाली दीड कोटीची भरपाई !

अपघातात इंजिनिअरला गमवावा लागला होता डावा पाय

Google News Follow

Related

अपंगत्वामुळे उत्पन्न कमावण्याची क्षमता पूर्णपणे गमावल्याचे निरीक्षण नोंदवून मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने शहरातील एका ३७ वर्षीय तरुणाला १ कोटी ५८ लाख रुपयांची व्याजासह भरपाई दिली आहे. सन २०१८मध्ये जेएनपीटी रोडवर एका डंपर ट्रकने त्याच्या स्कूटीला धडक दिल्याने कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करणाऱ्या तरुणाला त्याचा डावा पाय कापावा लागला होता.या व्यक्तीचे नाव पराग कडू असून त्याला ३२ हजार रुपये मासिक पगार मिळवत होता. या नुकसानभरपाईच्या रकमेमध्ये अपंगत्व, त्यामुळे झालेल्या वेदना आणि जीवन व आयुर्मानाची हानी यासाठी तीन लाख रुपये देण्यात आले आहेत.

‘पुराव्यांवरून असे सिद्ध झाले आहे की हा अपघात वाहनचालकाने बेदरकार आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्यामुळे झाला होता आणि त्या अपघातात अर्जदाराला दुखापत आणि अपंगत्व आले होते,’ असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे. ही रक्कम ट्रक मालक, एबीसी लॉजिस्टिक आणि द न्यू इंडिया ऍश्युरन्स कंपनी लिमिटेड यांनी द्यावी, असे निर्देश न्यायाधिकरणाने दिले. २३ नोव्हेंबर २०१८ रोजी अडीच वाजता त्यांचा अपघात झाला. तेव्हा त्यांना गंभीर जखमी अवस्थेत पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना नंतर सीबीडी बेलापूर येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आले. पराग कडू यांचा डावा पाय गुडघ्याच्या खाली कापावा लागला.

हे ही वाचा:

मान्सून आला!! अंदमानात तीन दिवस आधीच दाखल झाल्याने उत्साह !

राज ठाकरे, ही धरसोड नाही… हे आधीच ठरले होते!

कुठे आहे विरोधी ऐक्य? कर्नाटक शपथविधीला सोनिया, ममता आणि ठाकरे गैरहजर !

सुषमा अंधारेंनी ठाकरेंवर असे काय गारुड केले?

 

त्यांना एक महिन्यापेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यासाठी त्याने सुमारे १० लाख रुपये खर्च केले होते. अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या वाहनचालकाकडे वैध आणि प्रभावी ड्रायव्हिंग लायसन्स नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या धोरणातील अटी व शर्तींचा भंग झाला आहे. त्यामुळे विमा कंपनीला पूर्णपणे निर्दोष मुक्त करावे लागेल, असा बचाव विमा कंपनीतर्फे करण्यात आला. तथापि, बचावासाठी पुरावे सादर करण्याची जबाबदारी विमा कंपनीची आहे. कंपनीने या संदर्भात कोणताही साक्षीदार तपासला नाही किंवा त्याचा बचाव सिद्ध करण्यासाठी कागदोपत्री पुरावा सादर केला नाही.

त्यामुळे, विमा कंपनी आपला बचाव सिद्ध करण्यात अपयशी ठरली आहे,’ असे न्यायाधिकरणाने म्हटले आहे.
या दीड कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईत कृत्रिम पाय आणि त्याच्या देखभालीसाठी १४ लाख ४३ हजार रुपयांचा समावेश करण्यात आला आहे. “या प्रकरणात कृत्रिम अवयवाची किंमत तीन लाख २१ हजार रुपये धरण्यात आली आहे. अर्जदाराचे वय लक्षात घेता, त्याला कृत्रिम अवयव भविष्यात किमान दोनदा बदलावे लागतील. त्यामुळे, अर्जदार आधी खरेदी केलेल्या आणि भविष्यात खरेदी करणे आवश्यक असलेल्या कृत्रिम अवयवासाठी नऊ लाख ६३ हजार रुपये मिळण्यास पात्र आहे. अर्जदारास पुढील १६ वर्षांच्या कालावधीसाठी प्रति वर्ष ३० हजार रुपये देखभाल खर्च म्हणून मिळणे अपेक्षित आहे,’ असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. या सगळ्याची एकत्रित रक्कम म्हणून दीड कोटींची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश न्यायाधिकरणाने दिले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा