कांदळवनाच्या कत्तलीबाबत तक्रार करणाऱ्या वॉर्ड अध्यक्षासह महिलेला मारहाण

१० जणांविरोधात गुन्हा दाखल

कांदळवनाच्या कत्तलीबाबत तक्रार करणाऱ्या वॉर्ड अध्यक्षासह महिलेला मारहाण

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाच्या वार्ड अध्यक्षासह एका महिलेला जमावाकडून लाथाबुक्यांनी मारहाण होत असल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कांदिवली चारकोप येथील डिंगेश्वर तलाव परिसरातील ही घटना असून याप्रकरणी चारकोप पोलिसांनी छोटू नावाच्या व्यक्तीसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजेश साळवी हे आरपीआय पक्षाचे वॉर्ड क्रमांक ३१ चे अध्यक्ष आहे. कांदिवलीच्या लालजीपाडा या ठिकाणी राहण्यास आहे. साळवी यांनी वांद्रे जिल्हा अधिकारी कार्यालयात डिंगेश्वर तलाव, जलाराम मंदीराच्या मागे, सर्वे नं. ३८ चारकोप, कांदीवली या ठिकाणी असलेल्या सरकारी जागेवर कांदळवनाची कत्तल करून अतिक्रमन करीत असलेबाबत केलेल्या तक्रारीनंतर १ डिसेंबर रोजी येथील झोपड्यावर कारवाई करण्यात आली होती.

हे ही वाचा:

मित्राच्या मृत्युनंतर त्याचे ३ कोटी हडपले; गुन्हा दाखल

लंडनमध्ये त्यांना वडापाव पावला!

कर्नाळा किल्ल्याला मिळणार आता राज्याची ‘तटबंदी’

त्याने केली तब्बल ५०० कोटींच्या आयफोनची तस्करी

साळवी आणि नीता जैस्वार यांनी केलेल्या तक्रारीमुळे बेघर झाल्याचा राग मनात ठेवून स्थानिक नागरिकांनी शनिवारी दुपारी नीता जैस्वार हिला गाठून जाब विचारत असताना राजेश साळवी त्या ठिकाणी दाखल झाले. स्थानिक नागरिक साळवी यांच्यात शाब्दिक वाद होऊन १०ते १२ महिला पुरुषांनी राजेश साळवी आणि नीता जैस्वार या दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण करून धमकी दिली. या मारहाणीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला आहे.

चारकोप पोलिसांनी राजेश साळवी यांच्या तक्रारी वरून छोटू नावाच्या व्यक्तीसह १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version