पंजाब गुप्तचर कार्यालयावर आरपीजी हल्ला

पंजाब गुप्तचर कार्यालयावर आरपीजी हल्ला

सोमवार, ९ मे रोजी रात्री ८ च्या सुमारास पंजाबमधील मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर ग्रेनेड हल्ला झाला आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेडने (आरपीजी) गोळीबार केला, खिडकी फोडून अज्ञात आत गेला, मात्र स्फोट घडून आला नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. याचा पोलिसांनी तपास सुरू केला.

आतापर्यंतच्या तपासानुसार, दोन संशयित एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून आले. त्यांनी गुप्तचर कार्यालयाच्या इमारतीपासून सुमारे ८० मीटर अंतरावरून आरपीजी सुरू केली, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. स्फोटाच्या ठिकाणाजवळील तीन मोबाईल फोन टॉवरमधून पोलिसांना सुमारे सात हजार मोबाईल सापडले आहेत. या  हल्ल्याची माहिती मिळताच मोहालीच नव्हे तर ट्रायसिटीचे अधिकारीही कामाला लागले आहेत. चंडीगढचे एसएसपी कुलदीप सिंह चहल, एसएसपी मोहाली विवेकशील सोनी घटनास्थळी पोहोचले आणि सर्व वस्तुस्थिती पडताळून पाहिली.

हे ही वाचा:

नव्या आयपीओची ‘डेलिव्हरी’ घराघरात!

नाना पटोलेही करणार अयोध्या वारी

योगी सरकार देणार,अयोध्येतील चौकाला लता मंगेशकरांचे नाव

नवाब तो गियो… सोबत आणखी कोण?

या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिले आहेत. मान यांनी डीजीपी व्हीके भवरा यांच्याकडून या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. गुप्तचर विभागाचे मुख्यालय उडवण्याचा हल्लेखोरांचा कट होता, असे सांगण्यात येत आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असल्याचे मान यांनी ट्विट केले आहे. दोषींना सोडले जाणार नाही. दरम्यान, या प्रकरणावरून संपूर्ण पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Exit mobile version