आरपीएफ जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये अधिकाऱ्यासह चार जणांना घातली गोळी

गोळीबाराचे नेमके कारण अस्पष्ट, चौकशी सुरू

आरपीएफ जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये अधिकाऱ्यासह चार जणांना घातली गोळी

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) एका जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेस गाडीत केलेल्या गोळीबारात चार जण मृत्युमुखी पडले. या मृतांत पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचाही समावेश आहे. आरपीएफचे कॉन्स्टेबल चेतन यांनी चार जणांवर हा गोळीबार केला. सोमवारी पहाटे ५ वाजता ही घटना घडली. वापी ते बोरिवली या स्थानकांच्या दरम्यान हा गोळीबार झाला. मुंबई रेल्वे पोलिसांनी या कॉन्स्टेबलला ताब्यात घेतले आहे.

 

 

जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या या एक्स्प्रेसमध्ये (१२९५६) ही घटना बी ५ या बोगीत घडली. पोलिसांनी यासंदर्भात सांगितले की, ३१ जुलैला पहाटे ५.२३ वाजता ही घटना घडली. त्यात बी ५ या बोगीत गोळीबार झाला. कॉन्स्टेबल चेतन हे त्या गाडीत ड्युटीवर होते. त्यांनी सहाय्यक उपनिरीक्षक टिका राम यांच्यावर गोळीबार केला. पण त्यात आणखी तिघांचाही मृत्यु झाला.

 

हे ही वाचा:

पंढरपूरात अधिकाऱ्याच्या मुलाने केली विठ्ठलाची पूजा, वारकरी आक्रमक!

‘फक्त शाकाहारी’ वरून बॉम्बे आयआयटीत गोंधळ !

मोदींना हुकूमशाह म्हणणारे उद्धव ठाकरे सोनिया गांधींपुढे लोटांगण घालतात !

पत्रकारिता क्षेत्रात तंत्रज्ञान वापराचा नवा टप्पा; AI अँकरने घेतली मंत्र्यांची मुलाखत

दरम्यान ही घटना घडली तेव्हा ज्यांनी हे पाहिले त्या कृष्णकुमार यांनी सांगितले की, ही घटना ५ वाजताची आहे. गोळीबाराचा आवाज झाल्यामुळे आपल्याला जाग आली. सदर कॉन्स्टेबलने गोळी झाडली होती. ते ड्युटीवर होते. ते म्हणाले की, नेमके काय झाले होते हे कळले नाही पण गोळीबाराचा आवाज ऐकल्यावर मी उठलो. त्या कॉन्स्टेबलला कुणीही पकडले नाही. त्याच्या हातात बंदूक होती आणि तो ती घेऊन इकडेतिकडे फिरत होता. त्याने दुसऱ्या प्रवाशावरही मग गोळी झाडली.

Exit mobile version