करोना काळात ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात गैरव्यवहार झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचे रोमीन छेडा, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात नवी अपडेट समोर आली आहे. कोरोना काळात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवार, २४ नोव्हेंबर रोजी हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा प्रमुख रोमीन छेडा याला अटक केली आहे. गुन्हे शाखेने रोमिन याची गुरुवारी सलग आठ तास चौकशी केली होती.
रोमीन छेडा हा आदित्य ठाकरेंचा निकवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली आहे. रोमीन छेडा हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक असून या कंपनीला कोविड काळात ऑक्सिजन प्लांटशी संबंधित कंत्राट देण्यात आले होते. या सर्व प्रकरणात गैरप्रकार आढळल्याने आर्थिक गुन्हे शाखेने रोमीन याची चौकशी केली होती.
मुंबईच्या १३ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करण्याचे कंत्राट होते. त्यासाठी १४० कोटी रुपये देण्यात आले. रोमिनने पैसे घेतले आणि केवळ ३८ कोटींचे प्लान्ट उभारले. तसेच १०२ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापूर्वी रोमिन छेडाला मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन आणण्याचं कंत्राट देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु, त्याला विरोध झाल्यानंतर रोमिन छेडाला ब्लॅकलिस्ट केलं होतं. परंतु, त्याच रोमिन छेडाच्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या १३ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट सुरू करण्याचं कंत्राट दिलं गेलं
हे ही वाचा:
‘डीपफेक’बाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सात दिवसांत धोरणांमध्ये आवश्यक बदल करावेत
अंतरवली सराटीमधील दगडफेकीच्या घटनेतील मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या
बदनामीची धमकी देत माजी सैनिकाकडून पावणेचार लाख रुपये उकळले
चंद्रशेखर राव म्हणतात, जिंकलो तर मुस्लिम तरुणांसाठी खास आयटी पार्क उभारणार!
पालिकेच्या व्ही. एन. देसाई रुग्णालय, बी. डी. बी. ए. रुग्णालय, जीटीबी, कस्तुरबा, नायर, कूपर, भाभा, केईएम आणि सायन रुग्णालयात ३० दिवसात ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. कोणताही अनुभव नसताना आणि नियमांमध्ये बसत नसताना हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे.