अहमदनगरची आग म्हणे केंद्राने दिलेल्या व्हेन्टिलेटरमुळे लागली!

अहमदनगरची आग म्हणे केंद्राने दिलेल्या व्हेन्टिलेटरमुळे लागली!

आमदार रोहित पवार यांचा अजब दावा

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात आल्यापासून अनेक गोष्टींना केंद्र सरकार कारणीभूत असल्याचे आरोप करण्याची एक प्रथाच पडून गेली आहे. अहमदनगर येथे जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीलाही आता केंद्रच जबाबदार असल्याचा नवा आरोप केला गेला आहे. यावेळी हा आरोप केला आहे तो राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी.

रोहित पवार यांनी या आगीच्या घटनेनंतर रुग्णालयाला भेट दिली तेव्हा ही आग व्हेन्टिलेटरमुळे लागली असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. हे व्हेन्टिलेटर्स पीएम केअर फंडातून देण्यात आल्याचे ते म्हणाले. म्हणजेच त्यांचा रोख हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारवर होता. अर्थात, हे सांगून झाल्यावर आम्ही लगेच कुणावर आरोप करत नाही, असेही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

या जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत अतिदक्षता विभागातील ११ रुग्ण होरपळून मृत्युमुखी पडले. त्या रुग्णालयाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना रोहित पवार यांनी उपरोक्त आरोप केंद्र सरकारवर केले.

याआधीही, महाराष्ट्रात विविध ठिकाणी रुग्णालयांना आग लागली किंवा अपघात घडले आणि त्यात काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

हे ही वाचा:

दाऊदचा साथीदार चिंकू पठाण सोबत अनिल देशमुख काय करत होते?

रा. स्व. संघाचे प्रचारक संदीप आठवले यांचे अकाली निधन

क्रूझ प्रकरणातील सुनील पाटीलचा राष्ट्रवादी काँग्रेसशी कसला संबंध आहे?

राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्र्यांनी अहमदनगरच्या घटनेबद्दल व्यक्त केले दुःख!

 

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत रोहित पवार यांचा खरपूस समाचार घेतला आहे, अहो, रोहित पवार, शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पैशाने उभारलेल्या साखर कारखान्यांचा कोळसा करणारे पवार कुटुंबियांचे कर्तृत्व. तुमच्या हाती व्हेंटिलेटर दिला तर तुम्ही आगही लावू शकतात.

 

Exit mobile version