28 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामाधावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि...

धावत्या रिक्षावर १७व्या मजल्यावरून पडला लोखंडी रॉड आणि…

जोगेश्वरी पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्ग लगत 'एयम' कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बांधकाम सुरू आहे.

Google News Follow

Related

मुंबईत सुरू असलेल्या बांधकामामुळे मुंबईत फिरणे असुरक्षित झाले आहे, वरळी नंतर पश्चिम द्रुतगती महामार्ग जोगेश्वरी पूर्व या ठिकाणी शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून लोखंडी रॉड एका रिक्षावर पडला.

या दुर्घटनेत ७ वर्षाच्या मुलीसह आईचा मृत्यु झाला आहे.याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसानी बांधकाम कंत्राटदार आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांनी दिली. शमा बानो शेख (३०) आणि अयात असिफ शेख (७)असे या दुर्घटनेत मृत्यु झालेल्या आई आणि मुलीचे नाव आहे.

जोगेश्वरी पूर्व प्रताप नगर या ठिकाणी राहणारी शमा बानो ही सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुलगी अयात ला शाळेतून घरी रिक्षाने निघाली होती. या दरम्यान जोगेश्वरी पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्ग लगत ‘एयम’ कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या १७ व्या मजल्यावर स्लॅबला आधार देण्यात आलेला लोखंडी रॉड निखळला आणि तो रॉड थेट शमा बानो ही मुलीसह प्रवास करीत असलेल्या रिक्षावर पडून रिक्षाचे छत तुटून रॉड मायलेकीच्या डोक्याला लागला.

हे ही वाचा:

रायगडावर जात आहात, पण रोपवे बंद आहे!

१२ मार्च १९९३… ३० वर्षांनंतर मोदींनी चव्हाट्यावर आणला व्होरा समितीचा अहवाल….

तूर्त तरी ध्रुव हेलिकॉप्टरची घरघर थांबली.. जाणून घ्या कारण

६२ वर्षे झाली, आता ऑस्करविजेते रेड कार्पेटवरून चालणार नाहीत

या अपघातात दोघी गंभीर जखमी झाल्या, रिक्षा चालक हा थोडक्यात बचावला व त्याने स्थानिकांची मदत घेऊन जखमींना रिक्षातून बाहेर काढून उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मायलेकींना मृत घोषित केले.   या घटनेची माहिती मिळताच जोगेश्वरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेप्रकरणी पोलिसानी संबंधित बांधकाम कंत्राटदार आणि संबंधित व्यक्तिवर निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात इमारतीचे बांधकाम तसेच मेट्रोचे कामे सुरू आहे. विकासकांकडून बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेचे उपाय करण्यात येत नसल्यामुळे मुंबईत दररोज अश्या घटना घडत आहे. महिनाभरापूर्वी वरळी येथे फोर सीजन रेसिडेन्सी या ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक पडून दोन पादचारी मृत्युमुखी पडले होते. त्यामुळेच आता मुंबईत रस्त्याने चालणे,फिरणे असुरक्षित झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा