औरंगाबादहून मुंबईकडे येणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साधारण ८ ते १० जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. दौलताबाद- पोटूळ दरम्यान रात्री १ वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे.
रेल्वेच्या सिग्नलला कापड बांधल्याने चालकाला सिग्नल बंद दिसले त्यामुळे चालकाने गाडी थांबवून स्टेशन मास्तरला कळवले. दरम्यान, ८ ते १० जणांच्या टोळीने डब्यांमध्ये घुसून लुटमार केली. जवळपास अर्धा तास हा सगळा प्रकार सुरू होता. परिसर निर्मनुष्य असल्यामुळे तातडीने कोणतीही मदत पोहचू शकली नाही. त्यानंतर या दरोडेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
हे ही वाचा:
पनवेलचा सागर म्हात्रे ठरला पहिला मराठी इंडियन आयडॉल
जातीयवादाचे विद्यापीठ शरद पवार
अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?
सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!
दरम्यान, एक महिला प्रवाशांचे दागिने आणि प्रवाशांच्या इतर वस्तू दरोडेखोरांनी पळवल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे डब्बा S5 ते S9 वर दगडफेक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, ५ एप्रिल रोजी अशाच प्रकारे नंदीग्राम एक्स्प्रेस आणि नांदेड मनमाड पॅसेंजर रेल्वे थांबवून लुटमार केल्याची घटना घडली होती.