स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर येथील शाखेत सशस्त्र दरोडा, कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर येथील शाखेत सशस्त्र दरोडा, कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

पश्चिम उपनगरातील दहिसर पश्चिमेतील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत आलेल्या दोन तरुणांनी बँकेतील कर्मचाऱ्यावर गोळीबार करून अडीच लाख रुपयांची रोकड लुटून पोबारा गेला. या गोळीबारामध्ये एक कंत्राटी कर्मचारी ठार झाला असून एक जण जखमी झाला आहे. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारामुळे मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या एमएचबी पोलिसांनी दोन अनोळखी दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या शोधासाठी संपूर्ण मुंबईत नाकाबंदी करण्यात आली आहे.

दहिसर पश्चिमेतील एमएचबी कॉलनी परिसरातील एस व्ही रोडवर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत दुपारी ३.२६ च्या सुमारास दोन शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश केला. दोघांनीही तोंडाला मास्क लावलेले होते, त्यांच्यापैकी एकाने बँकेच्या कॅशियरकडे पिस्तूल रोखून पैशांची मागणी केली. त्यानंतर बँकेत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या संदेश गोमारे या कर्मचाऱ्याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्यात गोमारे आणि आणखी एक कर्मचारी जखमी होताच या दरोडेखोरांनी कॅश काउंटरवरून अडीच लाख रुपयाची रोकड घेऊन पळ काढला.

हे ही वाचा:

राजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार  

बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?

राजेश टोपेंना मिळणार ‘घोटाळेरत्न’ पुरस्कार

रणझुंजार नव्हे तर घरझुंजार! अतुल भातखळकर यांची टोलेबाजी

जखमी झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असता संदेश गोमारे याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले असून दुसऱ्या जखमीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गोमारे यांच्या छातीवर गोळी लागली होती आणि त्यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. दरोडेखोर हे कोणत्या दिशेने पळून गेले हे स्पष्ट झालेले नाही आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा माग काढण्यासाठी उत्तर विभागातील विविध पोलीस ठाण्यांमधून विशेष पथके तयार करण्यात आली आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी दोन अनोळखी दरोडेखोरांविरुद्ध दरोडा आणि खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version