प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया समोरील स्फोटकांच्या प्रकरणात एनआयएच्या ताब्यात असलेला एपीआय सचिन वाझे याचा साथिदार रियाझ काझी यांनी पोलिस सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकरणात काझींना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयएने) कालच अटक केली होती.
सचिन वाझेला या प्रकरणात अटक केल्यानंतर रियाझ काझी देखील एनआयएच्या रडारवर होतेच. या प्रकरणाशी निगडीत पुरावे नष्ट करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांना अटक करण्यापूर्वी एकदा काझींची चौकशी देखील करण्यात आली होती.
हे ही वाचा:
सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू
अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी याच आठवड्यात
लॉकडाऊनच्या भीतीने सेन्सेक्समध्ये मोठी पडझड
सर्वोच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
रियाझ काझी यांचे पोस्टिंग सीआययू विभागात करण्यात आले होते. सचिन वाझे याच्याशी चांगले संबंध असणारे अधिकारी म्हणून काझींची ओळख होती.
सीआययूने केलेल्या अनेक महत्त्वाच्या तपासांत काझींचा समावेश होता. टीआरपी घोटाळा, कंगना हृतिक वाद यासारख्या विविध तपासांच्या वेळी काझी देखील उपस्थित होते. अर्णब गोस्वामीला अटक करताना सीआययूने बजावलेल्या भूमिकेत वाझेसोबत काझी यांचा देखील सहभाग होता.
काझींनी वाझेला गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाड्यांच्या नंबर प्लेट बदलण्यासाठी मदत केली, तसेच वाझेच्या सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज डिलिट करण्यासाठी देखील काझींनी मदत केली असल्याचा दावा एनआयएने केला आहे.