अँटिलीया समोरील स्फोटकांचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या या दोन्ही खटल्यांमध्ये एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) सचिन वाझे याचा सहकारी रियाज काझी यांना अटक केली आहे.
यापूर्वी एनआयएला या प्रकरणात रियाझ काझी यांच्यावर एनआयएला संशय होता. सचिन वाझे यांच्या नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे ते महत्त्वाचे अधिकारी होते. त्यामुळे रियाझ काझी यांना देखील अटक करण्यात आली आहे. यापूर्वी एनआयएने एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदिप शर्मा यांची देखील चौकशी केली होती.
हे ही वाचा:
‘हिटमॅन’चे गेंड्याच्या बचावासाठी आवाहन
रियाझ काझी यांनी सचिन वाझेच्या सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचे पत्र दिले होते, असा आरोप देखील त्यांच्यावर केला जात आहे. त्यामुळे पुरावे नष्ट करणे आणि तथ्य लपवणे असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत.
शुक्रवारी एनआयए न्यायालयाने वाझेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन आठवडे म्हणजेच २३ एप्रिल पर्यंत ही न्यायालयीन कोठडी असणार आहे. आजपर्यंत वाझे हा एनआयए कोठडीत होता. या न्यायालयीन कोठडीच्या आदेशामुळे वाझे याची रवानगी आता तळोजा येथील न्यायालयात होणार आहे. दरम्यान वाझे प्रकरणात न्यायालयाने आणखीन एक महत्वाचा आदेश दिला आहे. वाझे याच्या प्रकरणाशी संबंधीत कागदपत्र हाताळण्याची परवानगी सीबीआयला देण्यात आली आहे. सीबीआय सध्या परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांच्या संदर्भात तपास करत आहे. या प्रकरणात वाझेचेही नाव असल्याने वाझेसी संबंधीत कागदपत्र हाताळण्याची परवानगी सीबीआयला देण्यात आली आहे.