27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामावाझेपाठोपाठ एपीआय रियाझ काझीचीही गच्छंती

वाझेपाठोपाठ एपीआय रियाझ काझीचीही गच्छंती

Google News Follow

Related

मुकेश अंबानी स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाजुद्दीन काझी याची सचिन वाजे पाठोपाठ पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रियाजुद्दीन काझी यांच्या बडतर्फीचा आदेश मुंबई पोलीस आयुक्त यांनी शुक्रवारी काढले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवणे तसेच या कारचा मालक मनसुख हिरेन याची हत्या जे दोन्ही प्रकरणे एनआयए कडून एकत्र करण्यात आली आहेत. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या सीआययूचे तत्कालीन प्रभारी सचिन वाझे आणि तात्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी तसेच गुन्हे शाखा कक्ष ११चे तात्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. स्फोटकांनी भरलेली कार ठेवणे, धमकी, कट रचणे, खून, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

हे ही वाचा:

नीतेश राणेंनी वादळग्रस्तांना दिली ५ हजार कौले आणि १ हजार पत्रे

इस्रायल-हमासमध्ये युद्धविराम जाहीर

‘केम छो वरळी’वाल्यांचे गुजरात ‘प्रेम’

मुख्यमंत्री म्हणाले, पंचनाम्यानंतरच मदत!

सचिन वाझे ,रियाजुद्दीन काझी आणि सुनील माने या तिघांना पोलीस खात्यातून प्रथम निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सचिन वाझे याला ११ एप्रिल रोजी पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले होते. त्या पाठोपाठ सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी याच्या बडतर्फीचा आदेश शुक्रवारी २१मे रोजी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढला. भारतीय संविधान १९४९मधील व महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम कलम ३११मधील तरतुदीच्या अन्वये दोघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काझी याची सशस्त्र पोलीस विभागात बदली करण्यात आली होती. काझीला याप्रकरणात अटक करण्यात आल्यानंतर तेथून त्याची निलंबनाचा आदेश देण्यात आला होता.

रियाजुद्दीन काझी हा १०२ बॅच मधील पोलीस उपनिरीक्षक असून २०१० मध्ये पोलीस खात्यात दाखल झाला. मुंबईत, वर्सोवा, सोनसाखळी चोरी विरोधी पथक याठिकाणी काम केल्यानंतर त्याची बदली सीआययू येथे करण्यात आली होती. सचिन वाजे सीआययु प्रभारी झाल्यानंतर आपल्याला वाजे सारखे नाव करण्याच्या नादात रियाजुद्दीन काझी प्रत्येक कामात वाझेच्या सोबत असायचा. मुकेश अंबानी प्रकरण, मनसुख हिरेन हत्या यामध्ये त्याने वाझेला साथ देऊन या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यास मदत केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा