अंडरवर्ल्ड निकटवर्तीय समजला जाणारा रियाज भाटी याला मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
वर्सोवा येथील एका व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे आणि महागडी मोटार खंडणीच्या स्वरूपात उकळल्याप्रकरणी रियाज भाटी आणि छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुट या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वर्सोवा येथे राहणाऱ्या एका व्यवसायिकाला छोटा शकील याचा मेहुणा सलीम इकबाल कुरेशी उर्फ सलीम फ्रुट आणि रियाज भाटी याने दाऊदची नावाने जीवे मारण्याची धमकी देऊन ३० लाख रुपये किमतीची महागडी मोटार कार आणि ७ लाख रुपये खंडणीच्या स्वरूपात उकळले होते. दाऊद आणि छोटा शकीलच्या भीतीने या व्यवसायिकाने त्यावेळी तक्रार दाखल केली नव्हती, मात्र सलीम फ्रुट याला एनआयए कडून अटक करण्यात आल्यानंतर या व्यवसायिकाने मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकात तक्रार दाखल केली.
हे ही वाचा:
अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
भुजबळ म्हणतात, सरस्वतीची नको, सावित्रीची पूजा करा
दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू केशव महाराजने दाखवून दिले खरे हिंदुत्व
१० युट्यूब वाहिन्यांवरील ४५ व्हिडीओ हटवण्याचे केंद्र सरकारचे निर्देश
याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री रियाज भाटी याला अंधेरी येथून अटक केली आहे. मंगळवारी त्याला किल्ला न्यायालय येथे हजर करण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणात एनआयएच्या अटकेत असलेला सलीम फ्रुट याचा ताबा घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून एनआयए च्या विशेष न्यायालयात अर्ज करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी सलीम कुरेशी तथा सलीम फ्रूट याला अटक केली होती. याच प्रकरणात सध्या महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत.