पोटाला दोन घास मिळतील, या आशेने मध्यरात्रीच्या सुमारास जेवणाच्या शोधात असणाऱ्या २१ वर्षीय बेगर्स तरुणीवर एका रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना मुंबईच्या पश्चिम उपनगरात घडली आहे. बलात्कारानंतर पळून गेलेल्या रिक्षाचालकाचा जुहू पोलिसांनी शोध घेऊन त्याला अटक केली आहे. मात्र मुंबई सारख्या शहरात या प्रकारची घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.
विलेपार्ले पश्चिमेतील फुटपाथवर राहणारी २१ वर्षांची ही तरुणी दोन दिवसांपूर्वी उपाशीच रात्रीच्या सुमारास फुटपाथ बसली होती. कोणी तरी तिला जेवण देईल, या आशेने ती येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाकडे आशेने बघत होती. मात्र तिच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. अखेर मध्यरात्र उलटून गेली आणि तिच्या पोटात भूकेने काहूर माजवले होते, ती उठली आणि कुठे जेवण मिळतंय हे बघण्यासाठी रस्त्यावर चालू लागली.
तेवढ्यात एक रिक्षा येऊन तिच्या पुढ्यात थांबली, आणि रिक्षाचालकाने तिच्याकडे चौकशी केली असता बहुत भूक लगी है, खाना मिलेगा क्या? असा प्रश्न तीने रिक्षा चालकाकडे केला. चलो मै तुमे खाना खिलाता हूँ, असे म्हणत त्याने तिला रिक्षात बसवले व रिक्षात फिरवून त्याने लालमिठ्ठी मैदान या ठिकाणी घेऊन आला. पहाटेचे तीन साडे तीनची वेळ होती, रिक्षाचालकाने तिच्यावर रिक्षातच बळजबरी करण्यास सुरुवात केली, तिने त्याला विरोध करताच त्याने तिला मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला त्याच अवस्थेत सोडून निघून गेला.
तीने कसेबसे स्वतःला सावरत कूपर रुग्णालय गाठले. तिला त्या अवस्थेत बघून डॉक्टरांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार डॉक्टराना सांगितला. डॉक्टरांनी लागलीच जुहू पोलिसांना कळवले. पोलिसांनी रुग्णालयात येऊन पीडित तरुणीचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला आणि रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. परिसरातील तसेच घटनास्थळा जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, त्यानंतर एका संशयित रिक्षा चालक मोहमद आरिफ गुलाम सरवर (३१) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी करताच त्याने गुन्हयाची कबुली दिली.
हे ही वाचा:
ठाण्यात खड्डे उखडलेत आणि लोकही!
लिओनेल मेस्सीचा बार्सिलोनाला राम राम
बारावीचा निकाल यंदा फर्स्ट क्लास! त्यामुळेच वाढली चिंता
ऑफिसमध्ये १०० टक्के उपस्थिती हवी, पण जायचे बसनेच!
याप्रकरणी जुहू पोलिसानी बलात्कार, मारहाण, आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रिक्षाचालक मोहम्मद सरवर याला अटक करून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला १२ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती जुहू पोलिसांनी दिली आहे.