पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला २० लाखांचे बक्षीस

दहशतवाद्यांची रेखाचित्र आणि नावे जाहीर

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला २० लाखांचे बक्षीस

जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गुरुवार, २४ एप्रिल रोजी पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचे रेखाचित्र आणि नावे जाहीर केली आहेत. आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई अशी या दहशतवाद्यांची ओळख पटल्याची माहिती आहे. तसेच फरार दहशतवाद्यांचा पत्ता सांगणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे.

मंगळवारी काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर हा खोऱ्यातील सर्वात घातक हल्ला असल्याचे मानले जात आहे. बुधवारी, राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) पथकही तपासात सामील होण्यासाठी आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांना या प्रकरणात मदत करण्यासाठी हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले. तर, दहशतवाद्यांचाही शोध सुरक्षा दलांकडून घेतला जात आहे. तपासकर्त्यांनी हा प्राणघातक हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांची ओळख पटवली होती, ज्यात तीन पाकिस्तानी नागरिक आणि दोन जम्मू आणि काश्मीरचे रहिवासी होते.

हे ही वाचा : 

भारताची पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कारवाई, पाकिस्तानचे ‘एक्स’ अकाउंट केले बंद!

“दहशतवाद्यांना आश्रय देताय, लाज वाटली पाहिजे…” पाकिस्तानी क्रिकेटपटूने सरकारला सुनावले

पहलगाम हल्ला : मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी विहिंपकडून यज्ञ

२० हजार जवानांनी एक हजार नक्षलवाद्यांना घेरले, पाच नक्षलवादी ठार!

दरम्यान, या हल्ल्यातील दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. हल्ल्याची घटना घडल्यापासून सुरक्षा दलाकडून दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. आदिल हुसेन ठोकर (रा. अनंतनाग), हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तल्हा भाई अशी या दहशतवाद्यांची ओळख पटली असून फरार दहशतवाद्यांचा पत्ता सांगणाऱ्यांना २० लाख रुपयांचे बक्षीसही पोलिसांनी जाहीर केले आहे.

मेणबत्या कसल्या पेटवता, तुमच्यातले गद्दार शोधा... | Amit Kale | Pahalgam Attack | Kashmir |

Exit mobile version