निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून चोरले जिवंत काडतुसासह रिव्हॉल्व्हर

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातून चोरले जिवंत काडतुसासह रिव्हॉल्व्हर

कुर्ला पूर्व कामगार नगर येथे राहणारे सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या राहत्या बंगल्यात चोरी झाल्याची घटना बुधवार सकाळी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करून या अधिकाऱ्याच्या घरातील परवाना असलेली रिव्हॉल्व्हर ५ जिवंत काडतुसे आणि ८ लाख रुपयांचा ऐवज चोरी करून धूम ठोकली आहे. रिव्हॉल्वर आणि काडतुसे चोरीला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली असून या चोरट्याचा शोधासाठी नेहरू नगर पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आली आहे.

दिगंबर काळे (६६) असे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे नाव आहे. कुर्ला पूर्व कामगार नगर येथील बंगला क्रमांक २० या ठिकाणी कुटुंबासह राहण्यास आहे. काळे हे २३ एप्रिल रोजी कुटुंबासह गावी गेले होते, मंगळवारी ते गावाहून परत आले असता त्यांच्या बंगल्याच्या स्वयंपाक घराच्या बाजूची ग्रील तोडलेली व खिडकी उघडी असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी घरातील कपाटे तपासली असता रोख रक्कम ४० हजार, सोन्याचे चांदीचे दागिने आणि त्यांची परवाना असलेली .३२बोअर ची रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हे ही वाचा:

आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांचे प्रभाग बदलले

…म्हणून धनंजय मुंडेंना न्यायालयाने फटकारले!

जीएसटी परतावा मिळाला, आता इंधनदर कमी होणार का?

१० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हजार कोटी

 

काळे यांनी तात्काळ नेहरू नगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून अज्ञात चोरट्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे यांच्या घरातून सुमारे ८ लाख रुपयांचा ऐवज आणि महत्वाचे म्हणजे काडतुसानी भरलेले रिव्हॉल्वर चोरीला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेहरु नगर पोलिसांचे तीन पथके या चोराच्या शोधासाठी तैनात करण्यात आलेली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Exit mobile version