23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामान्हावा शेवा बंदरातून २४ कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त

न्हावा शेवा बंदरातून २४ कोटींच्या परदेशी सिगारेट जप्त

सिगारेट्सची तस्करी करणारे पाच जण ताब्यात

Google News Follow

Related

गुप्तचर विभागाच्या विशिष्ट माहितीच्या आधारे मुंबईच्या महसूल गुप्तचर विभागाने न्हावा शेवा बंदरात अवैध पदार्थांची वाहतूक करणारा एक कंटेनर पकडला. हा कंटेनर पुढील मंजुरीसाठी अर्शिया फ्री ट्रेड वेअरहाऊसिंग झोनमध्ये उतरवला जाणार होता. या कंटेनरच्या हालचालींवर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष ठेवून होते.

कंटेनरने बंदर सोडल्यानंतर, गंतव्यस्थानी पोहोचण्याऐवजी तो अर्शिया एफटीडब्ल्यूझेडकडे जात असताना एका खाजगी गोदामाकडे वळवण्यात आला होता. आयात करण्यात आलेल्या कंटेनरमधून Esse, Dunhill, Mond आणि Gudang Garam या परदेशी ब्रँडच्या १.०७ कोटी सिगारेटी जप्त करण्यात आल्या. त्याचा पाठपुरावा करताना त्याच टोळीकडून यापूर्वी तस्करी करण्यात आलेल्या Esse Lights, Mond सारख्या विविध परदेशी ब्रँडच्या १३ लाख सिगारेट्स दुसऱ्या एका गोदामातून जप्त करण्यात आल्या.

महसूल गुप्तचर विभागाने जप्त केलेल्या या परदेशी १.२ कोटी सिगारेटचे एकूण बाजार मूल्य सुमारे २४ कोटी रुपये आहे. या कारवाईत आयातदारासह पाच जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या कंटेनरच्या हालचालीवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना लगेच संशयास्पद हालचाली जाणवल्या आणि त्यांनी गोदामात कंटेनर अडवला. या ४० फूट लांब कंटेनरमध्ये परदेशी कंपनीच्या सिगारेट्स भरलेल्या होत्या आणि भारतीय मानकांचे पालन न केल्यामुळे भारतात त्यांची आयात करण्यास बंदी आहे.

हे ही वाचा:

मागणी केली म्हणून तडकाफडकी निर्णय नाही !

समीर वानखेडे यांनी २५ कोटी उकळण्याचा कट रचला होता!

महाराष्ट्रात भाजपाचा पराभव होऊ शकतो काय?

खडकवासला धरणात नऊ मुली बुडाल्या, सात मुलींना वाचवण्यात यश

सीमाशुल्क अधिकाऱ्यांना फसवण्यासाठी त्या सिगारेट्स कंटेनरमधून काढून आयात दस्तावेजांमध्ये घोषित केलेल्या वस्तूंजागी ठेवून त्यांची तस्करी करण्याची योजना आखण्यात आली होती. हा कंटेनर अर्शिया एफटीझेडमध्ये नेण्यापूर्वी, सिगारेट्स काढून टाकल्यानंतर कंटेनरमध्ये भरावयाच्या आयात मालाचा गोदामात आधीच साठा केलेला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा