गुरुवार,१६ जून रोजी जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा डाव उधळून लावला आहे. कुलगाममध्ये सुरू असलेल्या कारवाईत लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हिंदू महिला शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येत या दहशतवाद्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.अनंतनागमध्येही हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे लष्कराने या परिसराची नाकेबंदी करून कारवाई सुरू केली आहे.
बुधवारपासून कुलगाममध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात येत होती. २४ तासांहून अधिक काळ चाललेल्या या कारवाईत लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येत या दहशतवाद्यांचा हात असल्याचे काश्मीर झोनच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
‘या’ कारणासाठी पंतप्रधान मोदी जाणार गांधीनगरला
उत्तर प्रदेशात ‘बुलडोझर कारवाई’ थांबविण्यास न्यायालयाचा नकार
‘मलिकांचं मंत्रीपद रद्द करा’ सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
३१ मे रोजी कुलगाम जिल्ह्यातील गोपालपोरा हायस्कूलमध्ये रजनी बाला या महिला शिक्षिकेला दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या भ्याड हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, अनंतनाग जिल्ह्यातील हंगलगुंड भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. निवासी भागात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. अनंतनागच्या कोकरनाग भागात हिजबुल मुजाहिद्दीनचे दोन दहशतवादी लपले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.