जम्मू-काश्मीर; नमाझ पढत असताना निवृत्त वरिष्ठ पोलिसाची दहशतवाद्यांकडून हत्या

जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथील मशिदीत नमाज पठण करताना दहशतवाद्यांनी केला हल्ला

जम्मू-काश्मीर; नमाझ पढत असताना निवृत्त वरिष्ठ पोलिसाची दहशतवाद्यांकडून हत्या

जम्मू-काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यात रविवारी एका निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे.मशिदीत नमाज अदा करत असताना दहशतवाद्यांनी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) मोहम्मद शफी मीर असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.पोलीस अधिकारी मीर हे शहरातील गंतमुल्ला बाला भागातील स्थानिक मशिदीत नमाज अदा करत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.या घटनेनंतर जम्मू-काश्मीर पोलिसांनी परिसराला वेढा घातला असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

हे ही वाचा:

‘उत्तर प्रदेश, बिहारमधले हिंदीभाषिक तमिळनाडूत शौचालये स्वच्छ करतात’

‘बृजभूषण यांचा निकटवर्तीय असलो तरी मी डमी उमेदवार नाही’

‘खासदारांचा जाणुनबुजून गोंधळ’; निलंबनाबाबत राज्यसभाध्यक्ष खर्गे यांच्याशी चर्चा करणार!

इस्राइली व्यापारी जहाजावर अरबी समुद्रात ड्रोन हल्ला

काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून म्हणाले की, निवृत्त पोलीस अधिकारी श्री मोहम्मद शफी हे गंटमुल्ला, शेरी बारामुल्ला भागातील मशिदीमध्ये अजानची नमाज पठण करत असताना दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळीबार केला त्यात ते गंभीर जखमी झाले.परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.अधिक माहितीची आम्ही प्रतीक्षा करत आहोत, असे काश्मीर पोलिसांनी पोस्ट वर लिहिले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात श्रीनगरच्या ईदगाह मशिदीजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात राज्य पोलिसांचा एक पोलिस निरीक्षक गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.इन्स्पेक्टर मसरूर अहमद वानी हे श्रीनगरच्या ईदगाह मैदानावर स्थानिक मुलांसोबत क्रिकेट खेळत असताना ही घटना घडली होती.

 

 

Exit mobile version