उत्तर प्रदेश पोलिस दलातील माजी आयपीएस अधिकाऱ्याचा चेहरा आणि आवाजाचा वापर करून डीपफेक व्हिडीओ बनवून एका ज्येष्ठ नागरिकाकडून खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या टोळीने ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे लैंगिक संबंध ठेवल्याचे छायाचित्र बनवले होते. ते बघून घाबरलेल्या या ज्येष्ठ नागरिकाने सायबर गुन्हेगारांना अनेकदा पैसे दिले.
पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी एफआयआर दाखल केला असून चौकशीला सुरुवात केली आहे. डीपफेकच्या मदतीने सायबर फसवणूक केल्याचे हे देशातील पहिलेच प्रकरण आहे.गोविंदपूरम येथील रहिवासी असणारे अरिवंद शर्मा हे एका कंपनीत क्लर्क म्हणून काम करतात आणि एकटेच राहातात. त्यांनी नुकताच त्यांचा पहिला स्मार्टफोन घेतला आणि त्यांनी फेसबुक अकाऊंट उघडले.
४ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा एका सायबरचोराने व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. शर्मा यांनी फोन घेतला, मात्र त्यात समोर एक नग्न बाई दिसताच अवघ्या काही सेकंदातच त्यांनी तो कट केला. मात्र एवढेही सायबरटोळीसाठी पुरेसे होते. एका तासानंतर त्यांना आणखी एक व्हिडीओ कॉल व्हॉट्सअपवर आला. त्यात एकजण पोलिस गणवेशात होता आणि धमकी देत होता. या व्हिडीओत या पोलिसाने त्यांना धमकी दिली. पैसे न दिल्यास पोलिस तक्रार करण्याची त्यांनी धमकी दिली. त्यात त्यांनी त्या नग्न स्त्रीशी बोलत असल्याचा फोटो सोशल मीडियावर आणि कुटुंबीयांत व्हायरल करण्याचीही धमकी दिली.
हे ही वाचा:
‘अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रतिस्पर्धी असणे हे भारताचे दुर्भाग्य’
‘द रेल्वे मेन’चा जगभरात धुमाकूळ!
दहशतवादी हरविंदर सिंग रिंदाचा भाऊ आणि वडील अटकेत
मुलुंडमध्ये प्रकाश गंगाधरेंच्या प्रयत्नाने नागरिकांना स्वस्तात कांदा
त्यामुळे शर्मा यांनी त्यांना दिलेल्या खात्यात पाच हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांची हाव वाढतच गेली आणि त्यांनी त्यांच्याकडे १० हजार, ५० हजार रुपये मागितले आणि शर्मा यांनी ते दिलेही. त्यासाठी त्यांनी ते काम करत असलेल्या कंपनीकडून कर्जही घेतले. मात्र गेल्या आठवड्यात त्यांनी आणखी पैसे म्गितले. मात्र आता हा त्रास शर्मा यांना सहन झाला नाही. शर्मा यांच्या मनात आत्महत्येचा विचारही तरळून गेला. तोपर्यंत त्यांनी सायबरटोळीला ७४ हजार रुपये दिले होते. त्यानंतर त्यांनी ही बाब कुटुंबीयांना सांगितली. मग सर्वांनी या आयपीएस अधिकाऱ्याचा गुगलवर शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा व्हिडीओ कॉल करणारी व्यक्ती माजी एडीजी प्रेम प्रकाश असल्याचे कळले. मात्र त्यांना शंका आली आणि त्यांनी गाझियाबाद पोलिस ठाणे गाठले.
कविनगरकचे सहायक पोलिस आयुक्त अभिषेक श्रीवास्तव यांनी तातडीने या ज्षेठ नागरिकाची भेट घेतली. सध्या ते सायबर सेलच्या मदतीने या गुन्ह्याचा माग काढत असून व्हिडीओजचे तांत्रिक विश्लेषणही करत आहेत. तसेच, बँक व्यवहारांचाही तपास केला जात आहे. मात्र पोलिसांना हा व्हिडीओ डीपफेक असल्याची शक्यता व्यक्त केली. सायबर टोळीचा माग काढण्यासाठी ते लवकरच फेसबुक आणि व्हॉट्सएपची मालक कंपनी असणाऱ्या मेटाशी संपर्क साधणार आहेत.
१९९३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असणारे प्रकाश यांना बुधवारी याबाबत समजले. तेव्हा त्यांनी काही सायबरचोरांनी त्यांच्या नावाचे खोटे फेसबुक खाते उघडून अनेकांना धमकी देऊन खंडणी उकळत असल्याची माहिती दिली.