25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरक्राईमनामाकेईएममधील निवासी डॉक्टरने इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या

केईएममधील निवासी डॉक्टरने इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या

आत्महत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांचे म्हणणे

Google News Follow

Related

मुंबईतील केईएम रुग्णालयातील २७ वर्षीय निवासी डॉक्टरने शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात स्वतःला इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नसून याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

 

अभिमन्यू पाटील (२७) असे आत्महत्या करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे.मूळचा जळगाव जिल्ह्यात राहणारा अभिमन्यू केईएम रुग्णालयाच्या मेडिसीन विभागाच्या पहिल्या वर्षात पदव्युत्तर शिक्षण घेत होता.केईएम रुग्णालयात जागा नसल्यामुळे काही महिन्यांपूर्वीच मेडिसीन हा विभाग शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात हलविण्यात आलेला आहे.

 

सोमवारी सकाळी अभिमन्यू हा निपचित अवस्थेत आपल्या खोलीत सहकाऱ्याना आढळून आला. त्याच्या शेजारी इंजेक्शनचे रिकामे सिरीज पडलेले होते, त्याला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे निदान तेथील डॉक्टरांनी केले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, घटनास्थळी दाखल झालेल्या रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी डॉ.आदिनाथच्या खोलीतून इंजेक्शन सिरीज ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी के ईएम रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पुण्यातून पकडलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून ५०० जीबी डेटा, ड्रोन फुटेज जप्त

वनडे वर्ल्डकपची भारत-पाकिस्तान झुंज १४ ऑक्टोबरला

आरपीएफ जवानाने जयपूर मुंबई एक्स्प्रेसमध्ये अधिकाऱ्यासह चार जणांना घातली गोळी

‘फक्त शाकाहारी’ वरून बॉम्बे आयआयटीत गोंधळ !

घटनास्थळी पोलिसाना सुसाईड नोट मिळून आलेली नसून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अपमृत्युची नोंद केली असून अभिमन्यूच्या कुटुंबाला कळविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
रुग्णालय सूत्रांच्या म्हणण्यानुसार केईएम रुग्णालयातील मेडिसीन विभागाचे दुरुस्तीचे कामसुरू असल्यामुळे केईएममध्ये जागा नसल्यामुळे हा विभाग शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात हलविण्यात आलेला आहे. अनेक डॉक्टर,नर्स आणि कर्मचारी यांनी पूर्वी याला विरोधही केला होता, या ठिकाणी कुठलीही सुविधा नसल्यामुळे अनेकांना त्याचा मनस्ताप होत असल्याचे म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा