कर्नाळा बँक प्रकरणी खातेदारांना आरबीआयचा निर्वाळा

कर्नाळा बँक प्रकरणी खातेदारांना आरबीआयचा निर्वाळा

कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीने अलिकडेच अटक केली. त्यांच्यावर कर्नाळा बॅकेच्या ५२९ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठी कारवाई केली आहे. यामुळे खातेदारांचा टांगणीला लागलेला जीव आता भांड्यात पडला आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द करण्यात आला आहे. असे असले तरी गुंतवणूकदारांना ९५ टक्के रक्कम परत मिळणार आहे, असे आश्वासन आरबीआयने दिले आहे. त्यामुळेच खातेदारांमध्ये एक आश्वासक वातावरण आहे.

आरबीआयने गुंतवणूकदारांना ९५ टक्के रक्कम परत मिळणार आहे, असे आश्वासन दिले आहे. त्याआधी आपले पैसे परत मिळतील, अशी आशा त्यांना वाटत होती. पैसे घेण्यासाठी ठेवीदारांना बँकेने अनेकदा तारखा दिल्या पण कोणत्याच ठेवीदाराला पैसे मिळाले नाही, हाती फक्त टोकन आले. आता आरबीआयच्या आश्वासनानंतर ठेवीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे ही वाचा:

अरेरे! चोर समजून केलेल्या मारहाणीत मृत्यू

कोकणातील महापुरात उद्योग गेला वाहून

लालपरी विजेवरी

सागरी किनारा मार्गबाधित ‘किनाऱ्यावर’च

कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ५२९ कोटींच्या घोटाळ्यामुळे अनेक बँकेचे खातेदार अडचणीत आले आहेत. त्यांचे पैसे बँकेत अडकले आहेत. तर काहींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या घोटाळ्याला बँकेच्या संचालक मंडळातील सहकारी जबाबदार आहेत. ५० हजार ६८९ ठेवीदारांच्या ५२९ कोटींच्या ठेवी बँकेत होत्या, असा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. दरम्यान, दीड वर्षांपूर्वी त्याच्यावर तसेच १७ संचालकांवर एफआयआर दाखल झाला होता. तरी देखील त्यांना अटक करण्यात आले नव्हते. याबाबत भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी ईडीकडे लेखी तक्रार केली होती.

Exit mobile version