…तिचा करण्यात आला होता तब्बल आठवेळा गर्भपात

…तिचा करण्यात आला होता तब्बल आठवेळा गर्भपात

निवृत्त न्यायाधीश असलेल्या वडिलांनी आपल्या मुलीचा विवाह उच्चशिक्षित, प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंब बघून त्या घरात लाऊन दिला. याच प्रतिष्ठेच्या आड विकृती लपली होती. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या कुटुंबाविरुध्द शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

वंशाचा दिवा हवा म्हणून पतीने पत्नीला परदेशात नेऊन तब्बल आठ वेळा गर्भपात केल्याची धक्कादायक घटना मुंबईमधील दादर येथून समोर आली आहे. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर काही दिवसातच पतीने महिलेचा छळ करण्यास सुरुवात केली. सासू आणि पतीने संयुक्त खाते खोलून महिलेच्या खात्यातील ३४ लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळते केले. २००९ मध्ये मुलीच्या जन्मानंतर अत्याचारात वाढ झाली. २०११ मध्ये पुन्हा गर्भवती राहिल्याने पतीने डॉक्टरकडे नेऊन मूल नको असल्याचे सांगत गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. २०१५ मध्ये पुन्हा पतीकडून मारहाण झाल्याने तिने घर सोडले. जवळपास ६८ तोळे सोने आणि ७० लाख रुपये सासारच्यांकडे असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखला भागौडा घोषित करा

कोंबड्याचे ‘कुकू च कू’, नी कश्मीरातील पहाट

मेघालयात ‘या’ कारणासाठी गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा

जुहू समुद्रात या जलचराचे आक्रमण

तक्रारदार महिलेचे पती आणि सासू सासरे तिघेही वकील, तर नणंद डॉक्टर आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी सासरच्या कुटुंबीयांवर गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायदा आणि हुंड्यासाठी छळ अशा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

‘मला माझी मालमत्ता जपण्यासाठी वंश हवा आहे’ अशी मागणी करत पतीने महिलेला त्रास द्यायला सुरुवात केली. मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरकडे मुलगा होण्यासाठी उपचार घेतले. तसेच प्री इम्प्लांटेशन जेनेटिक डायग्नोसिस (जन्मापूर्वी लिंग तपासणीसाठी बीजाची अंमलबजावणी) या टेस्टसाठी पतीने महिलेला बँकॉकमध्ये नेले. तिथे आठ वेळा गर्भधारणेच्या आधी एम्ब्रियोच्या (बीजाची) लिंगाची परीक्षा करून उपचार व शस्त्रक्रिया करत होते. भारतामध्ये बंदी असलेल्या उपचारासाठी संमतीशिवाय परदेशात नेऊन जवळपास आठ वेळा हा उपचार करून गर्भपात केला.

Exit mobile version