सोमवारपर्यंत समीर वानखेडेवर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणा सीबीआयला दिले आहेत.समीर वानखेडेवर अटकेसारखी पावले उचलू नयेत ,असे न्यायालयाने म्हटले आहे.
समीर वानखेडे याना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.सीबीआयने त्यांच्याविरुद्ध बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी सोमवारपर्यंत समीर वानखेडेवर कोणतीही कारवाई करू नये , असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहे.
शाहरुख खानकडे २५ कोटींची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखडेवर आहे.शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्स प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी ही लाच मागितली होती.मागील वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून एका क्रूझवर छापा मारण्यात आला होता.त्यात आर्यन खानसह अनेकांना अटक करण्यात आली होती.या कारवाईत आर्यन खान याला अनेक दिवस तुरुंगात राहावे लागले होते.या प्रकरणातून आर्यन खानला बाहेर काढण्यासाठी शाहरुख खानकडे लाच मागितल्या प्रकरणी सीबीआयने वानखेडेवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला.
समीर वानखेडे यांनी सीबीआयने आपल्याविरुद्ध दाखल केलेली याचिका रद्द करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली आहे.उच्च न्यायालयात समीर वानखेडे यांनी सांगितले की, २०मे रोजी सीबीआयच्या कार्यालयात जाऊन चौकशी करणार आहे.दरम्यान न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी केली, समीर वानखेडे हे तपासात सहभागी असले तरी २२ मे पर्यंत त्यांच्यावर अटकेसारखी कारवाई करू नये असे आदेश तपास यंत्रणा सीबीआयला दिले. समीर वानखेडे यांनी शाहरुख खान सोबतच्या गप्पाही कोर्टात सादर केल्या.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी धर्मांतर केले आहे
नड्डा यांचा ‘पीए’ असल्याचे सांगत आमदाराकडून पैशांची मागणी !
पंतप्रधानांच्या हस्ते २८ मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
काँग्रेस प्रवेश केला, राजदूतपद काढले; गिर्यारोहकाने केली म. प्र. सरकारवर टीका !
त्यात असे म्हटले आहे की, शाहरुख खानने आपल्या मुलाच्या अटकेनंतर मेसेज पाठवून आपल्या मुलाला वाचवा असे आवाहन केले होते.ते पुढे म्हणाले, शाहरुख खानने मला ऑफर सुद्धा दिली होती, जर माझ्या मुलाला या प्रकरणातून वाचवले तर मी आयुष्यभर तुझ्या पाठीशी उभे राहीन आणि तुला कोणत्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही असे शाहरुख खान म्हणाला होता असेही वानखेडे म्हणाले.
मालमत्ता; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून सादर केलेला अहवाल
मुंबईमध्ये चार फ्लॅट. वाशिमला ४.२ एकरची जागा. त्यांच्या गोरेगाव येथील पाचव्या फ्लॅटसाठी ८२ लाख ९० हजार रुपये खर्च केल्याचा आरोप. या फ्लॅटची अंदाजित रक्कम अडीच कोटी. त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्ता आणि अन्य कागदपत्रांमध्ये तफावत.
वानखेडे यांच्या मते, त्यांची पत्नी क्रांती हिने लग्नाआधी, फेब्रुवारी २०१७मध्ये या फ्लॅटमध्ये सव्वा कोटीची गुंतवणूक केली होती. मात्र सन २०१६-१७मधील आयटी रिटर्नची कागदपत्रे सादर न केल्याने या पैशांचा स्रोत अज्ञात.
१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च, २०२० या कालावधीतील आयटी रिटर्ननुसार, वानखेडे यांचे उत्पन्न ३१ लाख ५६ हजार रुपये होते. तर, त्यांची पत्नी क्रांती हिचे उत्पन्न १४ लाख पाच हजार रुपये होते. तर, दोघांच्या नोंद न केलेल्या व्यवहारांची रक्कम (मालदीव ट्रिप सात लाख २५ हजार आणि रोलेक्स घड्याळ २२ लाख पाच हजार) २९ लाख तीन हजार आहे.