26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरक्राईमनामासिगारेट देण्यास नकार; डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण !

सिगारेट देण्यास नकार; डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण !

पोलिसांकडून फरार डॉक्टरचा शोध सुरु

Google News Follow

Related

बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिगारेट देण्यास नकार दिल्याने एका नामांकित डॉक्टरने दुकानातील महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याचा खळबळ जनक प्रकार घडला आहे. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली आहे. मारहाण करणारा डॉक्टर अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

बुलढाण्यातली जळगाव जामोद येथे ही घटना घडली असून गोविंद वानखेडे असे महिलेला निर्वस्त्र करुन मारहाण करणाऱ्या नराधम डॉक्टरचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामोद येथे राहणाऱ्या एका महिलेचं छोटंसं किराणा मालाचं दुकान आहे. महिलेचं दुकान घराला लागूनच आहे. अशातच मध्यरात्री तीन वाजता गोविंद वानखेडे या डॉक्टरने महिलेच्या दुकानाचा दरवाजा ठोठावला. महिलेने दार उघडताच डॉक्टरने तिच्याकडे सिगारेट आणि चहाची मागणी केली. मात्र, महिलेने नकार देत उद्या सकाळी येण्यास सांगितले.

यावर संतापलेल्या डॉक्टरने महिलेस मारहाण करण्यास सुरुवात केली. महिलेचे कपडे फाडून तिला निर्वस्त्र करून मारहाण केली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे आरोपी डॉ.गोविंद वानखेडे याचे जळगाव जामोद शहरात वानखेडे हॉस्पिटल नावानं प्रख्यात हॉस्पिटल आहे.

हे ही वाचा:

विशाळगडावरील अतिक्रमण हटवा अन्यथा वक्फ बोर्डाच्या जमिनीवर मंदिरे बांधू !

बसप कार्यकर्त्याच्या निर्घृण हत्येनंतर मायावतींचा सवाल; तामिळनाडूत कायदा-सुव्यवस्था कुठे आहे?

रत्नागिरीतील गोहत्या बंद करा…संतप्त हिंदू समाजाचा मोर्चा !

छत्तीसगडच्या सुकमा येथे ५ नक्षलवाद्यांना अटक !

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी डॉ. गोविंद वानखेडेवर कलम ३७६/२०२४ , ७४, ७५, ७६, २९६, ३२४(१), ३३३, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) भारतीय न्याय संहितेनुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. घटनेनंतर डॉक्टर अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा