भाजपा नेते आणि कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे आणि आरोप रद्द केले जावेत, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, या याचिकेवर बृजभूषण सिंह यांना दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून पीडितांचे जबाब नोंदवले जाणार आहेत.
कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयात त्यांच्याविरोधात खटला सुरू आहे. याचं पार्श्वभूमीवर त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला लैंगिक शोषणाचा खटला रद्द करण्याची मागणी बृजभूषण सिंह यांनी केली होती. मात्र, त्यांची ही मागणी उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. तसेच पीडितांचे जबाब नोंदवले जाणार असल्याची बाब स्पष्ट केली आहे.
याचिका दाखल करण्याच्या निर्णयावर न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. आरोपांची निश्चिती झालेली असताना आणि साक्षीदारांच्या साक्ष नोंदवली जात असताना गुन्हे रद्द करण्याची मागणी कशी केली जाऊ शकते, असा सवाल न्यायालयाने विचारला आहे. बृजभूषण सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश नीना बन्सल कृष्णा यांनी म्हटले की, जर आरोप निश्चित केले गेले असतील तर सर्व काही गुणवत्तेवर फेटाळले जाऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीवर सर्वांगीण आदेश असू शकत नाही.
हे ही वाचा..
पुण्यात २२ वर्षी नौशाद चालवत होता बनावट टेलिफोन एक्स्चेंज
गजा मारणेच्या हातून सत्कार स्वीकारताच चंद्रकांत पाटील बनले टीकेचे धनी
हिंदू धार्मिक चिन्हे असलेले विजेचे खांब हटवण्याचे आदेश
बांगलादेशात जमात-ए-इस्लामी, इस्लामी छात्र शिबीरवरील बंदी उठवली
बृजभूषण सिंह यांनी त्यांच्याविरोधात सहा महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणात एफआयआर आणि आरोप रद्द करण्याची विनंती करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी म्हटले की, केवळ पीडितांचे म्हणणे ग्राह्य धरून तपास पक्षपाती पद्धतीने करण्यात आला आहे. तसेच माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत, ज्याचा कनिष्ठ न्यायालयाने विचार केला नाही.