31 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरक्राईमनामामाजी पोलिस आयुक्त संजय पांडेंच्या कार्यायातून रेड सर्व्हर जप्त

माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंच्या कार्यायातून रेड सर्व्हर जप्त

Google News Follow

Related

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावून ५ जुलै रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यांनतर त्यांची नॅशनल स्टॅाक एक्स्चेंजमधील सर्व्हर घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली गेली. यानंतर आता संजय पांडे यांच्यावर बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांची शुक्रवार, ८ जुलै रोजी चौकशी करण्यात आली.

या कारवाई दरम्यान, संजय पांडे यांच्या जोगेश्वरीमध्ये असलेल्या आयसेक सर्व्हिसच्या कार्यालयातही सीबीआयने छापा टाकला होता. यावेळी त्यांच्या कार्यालयातील २५ डेस्कटॉप जप्त करण्यात आले आहेत. तर दोन लॅपटॉपही सीबीआयने जप्त केले आहेत. फोन टॅपिंग केलेले काही संभाषण आणि त्यांचे ट्रान्स्क्रिप्ट्स सीबीआयच्या हाती लागले आहेत. जोगेश्वरीच्या या कार्यालयात १२० फोन कॉल्स एकाच वेळी टॅप करता येतील अशी क्षमता असलेली यंत्रणा होती, अशी माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा:

डॅशिंग IRS अधिकारी समीर वानखेडे यांचा सन्मान

एलन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सचा ट्विटर खरेदी करार केला रद्द!

गीता गोपीनाथ ‘आयएमएफ’च्या भिंतीवर झळकलेल्या पहिल्या महिला अर्थशास्त्रज्ञ

शिंदे- फडणवीस सरकारकडून मराठा समाजासाठी ३० कोटींचा जीआर

रेड सर्व्हर नावाच्या मशीनमध्ये एकाच वेळी फोन टॅपिंग केलेला डाटा साठवला जातो. हे रेड सर्व्हर नावाच यंत्रही जप्त करण्यात आलं आहे. २०१७ साली NSE घोटाळ्याची माहिती समोर येताच संजय पांडे यांनी हे फोन टॅपिंग थांबवलं होतं, अशी माहिती सीबीआयने दिली आहे. संजय पांडे यांची आजही सीबीआयकडून चौकशी होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा