सध्या बहुचर्चित असलेल्या पुष्पा चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी होत असल्याची गोष्ट आहे. रक्तचंदनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चित्रपटामुळे पुन्हा एकदा रक्तचंदन चर्चेत आले आहे. या रक्तचंदनाची तस्करी झाल्याचे एक प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगली येथून तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त केले आहे. मिरज गांधी चौकी पोलिसांनी एक टन वजनाचे ३२ ओंडके रक्त चंदन जप्त केले आहे.
बेंगलोर येथून एका टेम्पोतून हे रक्तचंदन येत होते. कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हे रक्त चंदन मिरज धामणी रोडच्या ठिकाणी जप्त केले आहे. याप्रकरणी यासीन ईनायतुल खान याला महात्मा गांधी पोलिसांनी अटक केली असून पश्चिम महाराष्ट्रातील महात्मा गांधी पोलीस ठाण्याची ही मोठी कारवाई आहे.
हे ही वाचा:
हिंदुस्थानी भाऊ’गर्दी’ने आणला नाकात दम
परमबीर सिंह वसुली प्रकरणात सॉफ्टवेअरमध्ये ‘छोटा शकील’
पुन्हा एकदा लघुग्रह पृथ्वीकडे झेपावला!
शिक्षण मंत्र्यांच्या घराला आंदोलक विद्यार्थ्यांनी घेरले
या कारवाईमध्ये एक गाडी आणि रक्त चंदनसहीत अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. ही कारवाई महात्मा गांधी पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे आणि महात्मा गांधी पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणामुळे आंतरराज्य रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे, असे पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सांगितले आहे.