24 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरक्राईमनामानंदुरबारमधील "त्या" विवाहितेच्या मृतदेहाचे 'पुनर्विच्छेदन'

नंदुरबारमधील “त्या” विवाहितेच्या मृतदेहाचे ‘पुनर्विच्छेदन’

हत्या की आत्महत्या या कारणावरून विवाहित महिलेचा मुंबईत पुन्हा शवविच्छेदन प्रक्रिया करण्यात आली.

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात गेल्या ४३ दिवसांपासून सुरू असलेल्या वडिलांच्या संघर्षाची अखेर सरकारने दखल घेतली आहे. विवाहित मुलीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची व्यथा मयत महिलेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. विवाहितेचा मिठात पुरलेला मृतदेहाचे पुनर्विच्छेदन करण्यास नंदुरबार जिल्हा न्यायालयाने मान्यता दिली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून मुलीची हत्या की आत्महत्या याबाबत मयत मुलीच्या पित्याकडे पोलीस व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करीत होते. बुधवारी सदर मृतदेह उकरून जे. जे. रुग्णालयात पुनर्विच्छेदन करण्यासाठी रवाना करण्यात आले. गुरवारी सकाळी मुतदेहाचे ‘जे.जे’त शवविर्च्छेदन करण्यात आले.

मयत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव परिसरात १ ऑगस्ट रोजी काही लोकांनी पीडितेला जबरदस्तीने कारमधून घेऊन गेले. त्यानंतर मुलीने वावी परिसरातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा फोन कुटुंबीयांना आला. घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आरोपींनी मृतदेह खाली आणून पुरावा नष्ट केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयाने शवविच्छेदणाचे अहवाल दिला. मात्र कुटूंबियांना तो मान्य नसल्याने नंदुरबारऐवजी पुन्हा मुंबईत शवविच्छेदन करण्याचे करावे, अशी मयत मुलीच्या पालकांनी विनंती केली.

हे ही वाचा:

जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला

‘नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही’

सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला

पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट

गेल्या ४५ दिवसांपासून त्यांनी आपल्या मुलीचा मृतदेह मिठात पुरला होता. शेवटी त्यांचा संघर्ष सत्ताधारी वर्गाच्या लक्षात आला. पोलिसांनी आरोग्य पथकासह घटनास्थळी धाव घेतली. संबंधित घटना नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात घडली. विवाहित मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप मयत मुलीच्या वडिलांनी केला. वडिलांच्या मागणीला गावकऱ्यांनीही पाठिंबा दिला. पोलिसांनी आरोग्य विभागाच्या मदतीने मुंबईत पुन्हा शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण केली असून, शवविच्छेदन अहवाला नंतर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा