आमदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नी व इतरांनाही आरोपी करण्यात आलं आहे

आमदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स

जोगेश्वरी भूखंड प्रकरणी शिवसेना (उबाठा ) आमदार रवींद्र वायकर यांना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने समन्स जारी केले आहे, सोमवारी त्यांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

 

जोगेश्वरी येथील मनपा भूखंड आणि पंचतारांकित हॉटेल प्रकरणात शिवसेनेचे उबाठा गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या विरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेने आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात रवींद्र वायकर यांच्यासह त्यांच्या पत्नीसह इतरांनाही आरोपी करण्यात आलं आहे.

हे ही वाचा:

उद्योग उभारणीसाठी ‘युएसआयबीसी’शी सहकार्य अधिक दृढ करणार

राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

४३ वर्षांनी बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीच्या आवळल्या मुसक्या

सर ज. जी. कला महाविद्यालय कलेचे जागतिक केंद्र व्हावे

रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरी येथील सुप्रीमो क्लबच्या जागेचा गैरवापर करून तेथे हॉटेल बांधताना चुकीच्या पद्धतीने ते बांधण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे. तत्पूर्वी, रवींद्र वायकर आणि अन्य चौघांनी मुंबईत आलिशान हॉटेल बांधण्यासाठी दिलेली परवानगी रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती.

 

याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रवींद्र वायकर यांना चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले आहे. सोमवारी त्यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स मध्ये म्हटले आहे.

Exit mobile version