बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनच्या वाहन चालकाने तीन जणांना धडक दिल्याची घटना शनिवारी रात्री वांद्रे पश्चिम रिजवी कॉलेज जवळ घडली, या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने टंडनच्या वाहन चालकाला मोटारीतून बाहेर काढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला असता अभिनेत्री रविना टंडन हिने वाहन चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात अभिनेत्री आणि जमावात तुरळक वाद झाल्याच्या व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.
आक्रमक झालेल्या जमावातील एकाने अभिनेत्रीच्या ड्रायव्हरने कुटुंबाला शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा तसेच नशेत असलेल्या रवीना टंडनने एका महिलेवर हल्ला केल्याचा आरोप व्हिडीओ मध्ये केला आहे. एका कथित व्हिडिओमध्ये अभिनेत्री रवीना टंडन जमावाला कोणालाही इजा न करण्याची विनंती करताना दिसली. “तिला रक्तस्त्राव होत आहे हे मला माहीत आहे. माझ्या ड्रायव्हरला हात लावू नका. मी तुम्हाला विनंती करते. कृपया असे करू नका.”
अभिनेत्री रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरला संरक्षण देण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने वारंवार हल्ला केला . व्हिडिओमध्ये जमावातील एक व्यक्ती “तुमचा ड्रायव्हर का पळाला? त्याने मला मारहाण केली. माझ्या नाकातून रक्त येत आहे. तुमच्या ड्रायव्हरला आमच्यासमोर आणा.” असे बोलत होता. वांद्रे येथील रहिवासी मोहम्मद शेख याने आरोप केला आहे की अभिनेत्री रवीना टंडन दारूच्या नशेत होती आणि तिने एका महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली , त्याने खार पोलिस ठाणे गाठले मात्र पोलिसांनी अभिनेत्री रवीना टंडन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याचा आरोप केला.
हे ही वाचा:
ती गाडी आपला मुलगाच चालवत होता….अल्पवयीन आरोपीच्या आईने दिली कबुली
मेगाब्लॉक संपला! मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत
“एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू”
तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी केजरीवाल हनुमानाच्या चरणी
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील कार्टर रोडवरील रिझवी कॉलेज जवळ शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अभिनेत्रीच्या मोटारीने फिर्यादीची आई, मुलगी आणि भाचीसह एका कुटुंबाला धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाली. या दरम्यान त्यांच्यात हाणामारी झाली. फिर्यादीचा आरोप आहे की, अभिनेत्रीचा ड्रायव्हर बाहेर आला आणि त्याने आई आणि मुलीला शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे घटनास्थळी जमाव जमा झाला आणि चालकावर हल्ला केला.
दरम्यान, अभिनेत्री रवीना टंडन बाहेर आली आणि तिच्या ड्रायव्हरला संरक्षण देऊ लागली.अभिनेत्री रवीना टंडन जमावाला भांडण थांबवण्याची आणि कोणालाही इजा करू नये, अशी विनंती करताना दिसली. अभिनेत्री रवीना टंडन दारूच्या नशेत असल्याचा आरोपही तक्रार कर्त्याने केला आहे.खार पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.