पुजारी टोळीचा शार्पशूटर सादिक बंगाली गजाआड

पुजारी टोळीचा शार्पशूटर सादिक बंगाली गजाआड

रवी पुजारी आणि सुरेश पुजारी या टोळीचा शार्प शूटर सादिक बंगाली याला शस्त्रासह मुंबईतील कॉटन ग्रीन येथून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधी पथकाने बंगाली याच्याजवळून दोन पिस्तुल आणि १५ काडतुसे जप्त केली आहेत. मुंबई पुण्यात सादिक बंगाली याच्यावर १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांनी दिली.

सादिक बंगाली (४४) हा मूळचा पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे राहणारा आहे. एक जण शस्त्राची विक्री करण्यासाठी कॉटन ग्रीन एअर फोर्स रोड या ठिकाणी येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना मिळाली होती.

या माहिती वरून खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून मोटारसायकलवरून आलेल्या एकाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन पिस्तुल आणि १५ जिवंत काडतुसे सापडली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती ही सादिक बंगाली असल्याचे समोर आले. सादिक बंगाली हा रवी पुजारी आणि सुरेश पुजारी टोळीचा शार्प शूटर असून त्याच्याविरुद्ध मुंबई पुण्यात हत्या, खंडणी, हत्येचा प्रयत्न अशा १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती योगेश चव्हाण यांनी दिली.

हे ही वाचा:

धक्कादायक! शवांना हाताळण्यासाठी १०० इंजीनियर्सनी केले एवढ्या जागांसाठी अर्ज

उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेता व्हावं पण राष्ट्रवादीपेक्षा मोठं नाही

शरद पवारांच्या वक्तव्यावर फडणवीस ‘हे’ बोलले

आता ‘हा’ भारतीय खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह

रवी पुजारी याच्या सांगण्यावरून सादिक बॉलिवूड मधील चित्रपट निर्माते, बांधकाम व्यवसायिकांना धमकावणे, त्यांच्यावर गोळीबार करणे या प्रकारचे गुन्हे करीत होता. रवी पुजारीच्या अटकेनंतर सादिक हा पुण्यातील एका खेड्यात लपून बसला होता. रवी पुजारीच्या अटकेनंतर सादिक याला काम मिळत नसल्यामुळे त्याने त्याच्याकडे असलेले शस्त्र विकण्याचा बेत आखला आणि पकडला गेला.

Exit mobile version