देशात सर्वत्र नव वर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यासाठी लोक उत्सुक असताना पोलीस आणि प्रशासन यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. अशातच ठाण्यात पोलिसांनी नववर्षाच्या संध्येला मोठी कारवाई केली आहे. एक रेव्ह पार्टी ठाणे पोलिसांनी उधळून लावली आहे. या रेव्ह पार्टीत मद्यधुंद आणि नशेत धुंद असलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या पार्टीमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १०० तरुणांना ताब्यात घेतले आहे. पार्टीत गांजा, चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
थर्टीफर्स्टनिमित्त ठाण्यात ठाणे गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई केली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. रेव्ह पार्टीतील सुमारे १०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
महत्त्वाच्या ‘सर्वोच्च’ निकालांचे ठरले २०२३ हे वर्ष
दहशतवादी हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी पाकिस्तान सरसावले!
नौदल अधिकाऱ्यांच्या वर्दीवर शिवमुद्रा; नवे स्कंधचिन्ह जाहीर!
‘इस्रायल-हमासचे युद्ध पंतप्रधान मोदीच थांबवू शकतात’
थर्टीफर्स्ट सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद अवस्थेत पार्टीमध्ये सामील झाल्याचं दिसून आलं. एका खाजगी प्लॉटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते. रेव्ह पार्टीत कारवाई केलेल्या सुमारे १०० जणांची चौकशी करण्यात येत असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. रेव्ह पार्टीत ताब्यात घेतलेल्या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून मेडिकलसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेलं आहे.