निनावी पत्रातून मुख्यमंत्री, पोलिस आयुक्तांना दिली माहिती
गेल्या काही काळापासून मुंबईत वसुलीची चर्चा होत असताना आणि पोलिसांना विविध व्यवसायिकांकडून वसुलीची कामे सोपविण्यात आल्याचे आरोप केले जात असताना आता एक नवे सनसनाटी प्रकरण समोर आले आहे.
निनावी व्यक्तीने समता नगर पोलीस ठाण्यातील सीनियर पोलिस निरीक्षक यांच्याकडून होणाऱ्या हद्दीतील वसुलीचे रेट कार्ड मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त यांना हे पत्राच्या माध्यमातून पाठविले आहे. या पत्रात हे नमूद करण्यात आले आहे की, विविध व्यापारी समुदायातील सदस्यांना पोलिसांकडून टार्गेट केले जात असून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे ‘रेट कार्ड’ तयार केले आहे. विविध व्यापारी सदस्यांकडून तो काढत असलेली रक्कम खालीलप्रमाणे आहे-
१) आंचल बार ७५ हजार दरमहा
२) नित्यानंद बार ७५ हजार दरमहा
३) ललित बार ७५ हजार दरमहा
४) सावली बार ७५ हजार दरमहा
इतर लेडीज बार –
रु.५० हजार ते ७५ हजार प्रति महिना
बार आणि रेस्टॉरंट्स
रु.६० हजार दरमहा
कार्ये आणि पार्टी आयोजित करण्यासाठी प्रति कार्यक्रम रु.२ हजार
बिल्डर्स आणि डेव्हलपर्स
१) शिवम बिल्डर्स – रु. ५० हजार प्रतिमाह
२)लोढा बिल्डर्स रु.५० हजार दरमहा
३) यूके बिल्डर्स- रु.५० हजार प्रति महिना
४) आदित्य बिल्डर्स ५० हजार प्रतिमाहिना
इतर बांधकाम व्यावसायिक
रु.४० हजार प्रति महिना
आता या प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे चौकशी करीत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून १०० कोटी वसुलीचे लक्ष्य ठेवले जात असे, असे आरोप करण्यात आले होते. त्याची यानिमित्ताने आठवण झाली.