31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामाहॉटेलमधील चिकन प्लेटमध्ये उंदीर की खंडणी उकळण्याचा प्रयत्न?

हॉटेलमधील चिकन प्लेटमध्ये उंदीर की खंडणी उकळण्याचा प्रयत्न?

कूकसह मॅनेजरला अटक आणि जामिनावर सुटका

Google News Follow

Related

वांद्र्यातील एका रेस्टॉरंटमधील चिकन डिशमध्ये उंदीर सापडल्याने दोन कुक आणि मॅनेजरला वांद्रा पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्यांची मंगळवारी जामिनावर सुटका करण्यात आली. मात्र या तक्रारदाराचा रेस्टॉरंटकडून खंडणी उकळण्याचा डाव होता. तो अयशस्वी ठरल्याने रेस्टॉरंटची बदनामी करण्यासाठी त्याने ही तक्रार केल्याचा रेस्टॉरंटच्या वकिलाचा दावा आहे.

 

 

रविवारी रात्री पाली नाका येथील पापा पांचो दा ढाबा येथे एक वरिष्ठ बँक मॅनेजर आणि त्यांचा मित्र जेवण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांनी मागवलेल्या चिकन डिशमध्ये उंदराचे मांस दिसल्याने त्यांना धक्का बसला. या दोघांनी वांद्रे पोलिसांकडे याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तेथील दोन कूक आणि मॅनेजरला अटक केली आणि मंगळवारी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

 

ही घटना रविवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. गोरेगाव येथील बँक अधिकारी अनुराग सिंग (४०) आणि त्यांचे मित्र आमिन खान (४०) हे दोघे त्यावेळी येथे भोजनासाठी आले होते. या दोघांच्या तक्रारीनंतर कूक नारायण दास आणि संजीव कार तसेच, मॅनेजर व्हिव्हियान सिक्वेरा या दोघांना अन्नपदार्थात भेसळ करून जीविताला धोका उत्पन्न करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

‘ज्या चिकन डिशमध्ये उंदराचे मांस आढळले होते, तो पदार्थ एफडीएकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे,’ अशी माहिती वांद्रे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांनी दिली. तर, ‘आमचे रेस्टॉरंट खूप जुने आहे. गेल्या २२ वर्षांत येथे अशाप्रकारची एकही घटना घडलेली नाही. जेव्हा त्यांना जेवण वाढण्यात आले, तेव्हा मी तिथे नव्हतो. मी घरी जाण्यास निघालो होतो, परंतु रेस्टॉरंटमध्ये अडचण आल्याने मी परत आलो. त्या दोघांनीही अति मद्यप्राशन केले होते. तसेच, ते तिथेच छोट्या दारूच्या बाटल्या घेऊन आले होते आणि मद्य पिण्याचा प्रयत्न करत होते. मात्र आमच्या हॉटेलमध्ये आम्ही मद्य देत नसल्याने आम्ही त्यांना तसे करण्यास विरोध केला. त्यावर त्यांनी आमच्याविरोधात तक्रार करण्याची धमकी देऊन आमच्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केला. आमच्या खाद्यपदार्थांची काटेकोर तपासणी केली जाते, त्यामुळे असे काही घडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असेही मॅनेजर सिक्वेरा यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

शिमल्यामध्ये जोशीमठसारखी परिस्थिती; घरांना भेगा

आता नेहरू मेमोरियल नाही, प्राईम मिनिस्टर म्युझियम

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणाला मारहाण

पंतप्रधान मोदींचा पुनरुच्चार; मी पुन्हा येईन…

‘त्या दोघांनी जेव्हा उंदराचे मांस असल्याची तक्रार केली होती, तेव्हा त्यांचे जवळपास सर्व जेवण झाले होते. तसेच, त्यांनी मॅनेजरला या प्रकरणात तिथेच तडजोड करायची का, असे विचारून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते पोलिसांकडे गेले. हे सर्व आमच्या रेस्टॉरंटची बदनामी करण्यासाठी केले गेले,’ असा दावा रेस्टॉरंटचे वकील देवराज गोरे यांनी केला.

 

खान याने ‘वांद्रा पश्चिमेकडील पाली नाक्याजवळील पापापेंचोदाधाबा येथील ग्रेव्हीत उंदीर सापडला आहे. मॅनेजर किंवा हॉटेल मान्य करण्याच्या तयारीत नाहीत. आम्ही पोलिसांना कळवले आहे. तसेच, १०० नंबरवर फोनही केला आहे. मात्र अद्याप कोणतीही मदत आलेली नाही,’ असे मुंबई पोलिसांना टॅग करून ट्वीट केले आहे. तर, रेस्टॉरंट मॅनेजरने त्यांच्या आरोपाबाबत योग्य ते स्पष्टीकरण न दिल्याने या दोघांनी तक्रार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा