रशिद सिद्दिकी बनला शंकर शर्मा अन आयेशा बनली आशा; १० वर्षे भारतात होते वास्तव्याला

पाकिस्तानी कुटुंबाला बंगळूरूमधून अटक

रशिद सिद्दिकी बनला शंकर शर्मा अन आयेशा बनली आशा; १० वर्षे भारतात होते वास्तव्याला

कर्नाटकमधील बंगळूरूमधून बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या एका पाकिस्तानी कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. हिंदू नावे वापरून हे कुटुंबीय गेली १० वर्षे भारतात राहत होते. पोलिसांनी रशिद अली सद्दिकी (वय ४८ वर्षे), आयेशा (वर्ष ३८ वर्षे), हनीफ मोहम्मद (वय ७३ वर्षे), रुबिना (वय ६१ वर्षे) यांना राजपुरा गावातून अटक करण्यात आली आहे. या कुटुबांने अनुक्रमे शंकर शर्मा, आशा रानी, राम बाबू शर्मा आणि रानी शर्मा अशी नावे धारण केली होती.

काही दिवसांपूर्वी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या नागरिकांकडून या कुटुंबाची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. यानंतर बंगळुरू पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस जेव्हा सिद्दिकीला अटक करण्यासाठी घरी पोहोचले, तेव्हा सिद्दिकी आणि कुटुंबीय बॅग भरून पळ काढण्याच्या तयारीत होते.

हे ही वाचा : 

पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा पाठींबा कायम असेल

लेबनॉनमध्ये इस्रायली सैन्य घुसलं; हिजबुल्लाच्या ठिकाणांवर जमिनीवरून हल्ले करण्यास सुरुवात

धारावीतील मशिदीचे अनधिकृत बांधकाम काढण्यास सुरुवात!

कानपूरमध्ये पुन्हा ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडला ‘अग्निसुरक्षा सिलेंडर’

पोलिसांनी सिद्दिकीची चौकशी केल्यानंतर ते २०१८ पासून बंगळुरूमध्ये राहत असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या आधारकार्डवर हिंदू नावे असल्याचे आढळून आले. शिवाय घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातील भिंतीवर “मेहदी फाऊंडेशन इंटरनॅशनल जश्न-ए-युनूस” असे लिहिलेले होते. तसेच भिंतीवर काही मौलवींचे फोटो होते. त्यानंतर अधिकाची चौकशी केली असता सिद्दिकी उर्फ शंकर शर्मा याने ते लोक पाकिस्तानी असल्याचे कबूल केले. सिद्दिकी भारतात आल्यानंतर ते सुरुवातीला काही दिवस दिल्लीत राहिले. त्यानंतर त्यांनी शर्मा नावाने बोगस पारपत्र, आधार कार्ड आणि वाहन चालक परवाना तयार केला. पुढे ते बंगळूरूमध्ये राहून धर्म प्रसाराचे काम करू लागले. आरोपींवर पासपोर्ट अधिनियम १९६७ अंतर्गत कलम १२ (१), १२ (१एबी), १२(२) चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version