उत्तरप्रदेशमधील एका १८ वर्षीय तरुणीला तिच्या काकांच्या घरी सोडतो असे सांगून कारमधून अज्ञातस्थळी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची खळबळजनक घटना वांद्र्यात उघडकीस आली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत निर्मलनगर पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली. उत्तरप्रदेशमधील आजमगडच्या रहिवासी १८ वर्षीय पीडित तरुणीला सांताक्रुझ, गोळीबार रोड येथील आरोपी फिरोज अब्दुल मोतीन खान (३१) याने वांद्रे पूर्व परिसरातून काकांच्या घरी सोडतो असे सांगून तिला कारमध्ये बसवले.
आरोपी फिरोजने पीडित मुलीला पाण्याच्या बाटलीतून गुंगीचे औषध प्यायला देत तिला एका पडीक इमारतीमध्ये नेले. येथे लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची तक्रार पीडित तरुणीने निर्मलनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. यात तिने आरोपींनी कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे.
हे ही वाचा:
सांगली अत्याचार प्रकरण: नागरिकांकडून आरोपीच्या घरासह घटनास्थळाची तोडफोड!
दुर्गाष्टमीचा पूजापाठ पोलिसांनी घरात घुसून केला बंद, स्थानिकांकडून संताप!
‘हरियाणा जिंकले, आता महाराष्ट्र जिंकायचाय’
धक्कादायक! नौशाद आणि हसन अलीकडून चहात थुंकीचा प्रकार!
पीडित तरुणीची फिर्याद नोंदवून घेत पोलिसांनी तिला उपचारांसाठी भाभा रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ७०(१),१२३, ३०८(२), ३५१(२), ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने आरोपी फिरोजला अटक करत गुन्ह्याचा पुढील तपास सुरू केला आहे. पीडित तरुणीसुद्धा जबाबात वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलीस तिच्याकडेही चौकशी करत आहेत.