बीएआरसी वसाहतीत शीतपेय पाजून विद्यार्थीनीवर बलात्कार

घरात बोलावून केले कृत्य, पोलिसांकडून दोघांना अटक

बीएआरसी वसाहतीत शीतपेय पाजून विद्यार्थीनीवर बलात्कार

चेंबूरमधील पोस्टल कॉलनी येथील भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी) वसाहतीत एका फ्लॅटमध्ये १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थीनीवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चेंबूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १० ते १ च्या दरम्यान घडली. चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

 

पालघर जिल्ह्यातील भोईसर येथे आई आणि बहिणीसोबत राहणारी १९ वर्षीय पीडित विद्यार्थीनी चेंबूर येथील बीएआरसी वसाहतीत राहणाऱ्या तिच्या वडिलांकडे नेहमी येत जात असते. नेहमी प्रमाणे दिवाळीत पीडिता ही वडिलांकडे आली होती. त्याच वसाहतीत पीडितेचा २३ वर्षीय मित्र राहण्यास आहे. १६ नोव्हेंबर रोजी रात्री मित्राकडे स्वयंपाक घरात लागणाऱ्या काही वस्तू मागण्यासाठी आली, त्यावेळी पीडितेचा मित्र आणि दुसरा एक तरुण हे दोघेच घरात होते, घरी आलेल्या पीडितेला तीच्या मित्राने घरात बोलावून तीला’ स्प्राईट’ हे शीतपेय दिले.

हे ही वाचा:

शुभमन गिल खेळतोय, भारतीय संघ करणार फलंदाजी, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला

भारतीय अर्थव्यवस्थेने गाठला ४ दशलक्ष डॉलर्सचा टप्पा

उत्तरकाशीत मजुरांना बाहेर काढण्याचा परदेशी तज्ज्ञ, सहा पथके

जरांगेना भुजबळांनी चेपले ते विसरा; पण डॉ.आंबेडकर लक्षात ठेवा….

शीतपेय प्यायल्यानंतर पीडितेची शुद्ध हरपली रात्री उशिरा ती जेव्हा शुद्धीवर आली त्यावेळी तिच्यावर ओढवलेला प्रसंग तिला आठवला आणि घाबरत घाबरत ती तशीच घरी आली. दुसऱ्या दिवशी तिने तिच्यावर झालेल्या प्रसंगाबाबत त्याच इमारतीत राहणाऱ्या मैत्रिणींना दिली. मैत्रिणीने तिला पोलिस तक्रार करण्याचा सल्ला दिला. पीडितेने चेंबूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्या सोबत घडलेला सर्व प्रसंग तिने पोलिसांना सांगितला.

 

चेंबूर पोलिसांनी तात्काळ दोन जणांविरुद्ध भा.द.वि.कलम ३७६ (लैगिंक अत्याचार), ३७६ (डी) (सामूहिक लैगिंक अत्याचार), ३२८ (गुंगीचे ओषध देऊन दुखापत करणे), ३४ (सामान्य हेतू) या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दोघांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघाना २० नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Exit mobile version