धक्कादायक! गोरेगावमध्ये रिक्षात महिलेवर अतिप्रसंग

उत्तर प्रदेशामधून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या

धक्कादायक! गोरेगावमध्ये रिक्षात महिलेवर अतिप्रसंग

मुंबईत एका तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील गोरेगाव येथील आरे कॉलनी परिसरात २० वर्षीय महिलेवर रिक्षा चालकाने अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेऊन आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली आहे. सर्वात आधी आरोपीने महिलेला मारहाण केली आणि त्यानंतर तिला धमकावत तिच्यावर बलात्कार केला. तसेच, तिने याची वाच्यता करून नये यासाठी तरुणीला धमकावले.

इंद्रजित सिंह असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो मुंबईत रिक्षा चालवत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘एबीपी माझा’ने या संदर्भात वृत्त दिले आहे. आरोपीने तरुणीला धमकावल्यामुळे भीतीपोटी तरुणीनं घडलेल्या प्रकाराची वाच्यता कुठेच केली नाही.

काही महिन्यांपूर्वी पीडित महिलेची प्रसूती झाली होती. पण घटनेच्या काही दिवसांनी महिलेला रक्तस्त्राव होऊ लागला. कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेत महिलेची तपासणी करून घेतल्यास डॉक्टरांना तपासणी दरम्यान महिलेच्या शरीरावर काही जखमा आढळून आल्या. महिलेला विश्वासात घेऊन चौकशी केली असता महिलेनं तिच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत डॉक्टरांना आणि कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला सीबीडी बेलापूर येथे तिच्या मावशीच्या घरी गेली होती, तिथून परतताना तिने नवी मुंबई ते गोरेगाव रिक्षा बुक केली. रिक्षा आरे कॉलनीत पोहचली, त्यावेळी रिक्षा चालकानं रिक्षा एका निर्जन स्थळी नेली. त्यानंतर त्याने महिलेला मारहाण केली आणि महिलेवर बलात्कार केला. तसेच त्याने याबाबत कुठेच वाच्यता न करण्यासाठी धमकावले आणि घटनास्थळावरुन पळ काढला. पुढे त्याने थेट उत्तर प्रदेश गाठलं.

हे ही वाचा:

उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा हाहाःकार; रस्ते, पूल गेले वाहून

‘वंदे भारत ट्रेन’ आता केसरी रंगात दिसणार!

दिल्ली बुडाली; दिल्लीकरांची केजरीवालांवर टीका

गोळवलकर गुरुजींबाबतचे ट्विट दिग्विजय यांना पडणार महागात

या प्रकरणाची माहिती मिळताच, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी रिक्षाच्या मालकाकडे चौकशी केली असता घटनेत्या दुसऱ्याचं दिवशीच चालक फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या. रविवार, ९ जुलै रोजी आरोपीला अटक करुन उत्तर प्रदेशातून मुंबईत आणण्यात आलं.

Exit mobile version