धावत्या टॅक्सिमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार !

मालाड मधील मालवणी भागातील घटना

धावत्या टॅक्सिमध्ये गतिमंद मुलीवर बलात्कार !

एका १४ वर्षांच्या गतिमंद मुलीचं अपहरण करून धावत्या टॅक्सिमध्ये बलात्काराची घटना मुंबईमध्ये घडली आहे.या प्रकरणामध्ये आरोपी सलमान शेख आणि टॅक्सी चालक श्रीप्रकाश पांडे याना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.टॅक्सी चालक श्रीप्रकाश पांडे याने आरोपी सलमान शेख याला मदत केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही १४ वर्षीय गतिमंद असून दक्षिण मुंबईतील रहिवासी आहे.मुलीचा कुटुंबियांशी वाद झाल्याने तिने घर सोडले होते.त्यानंतर तिने मुंबईतील मालाड मालवणी या ठिकाणी आपल्या नातेवाईकांकडे जाण्याचा प्रयत्न केला.पीडित मुलगी सोमवारी पहाटेच्या सुमारास आरोपी टॅक्सी चालक श्रीप्रकाश पांडे याच्या टॅक्सित बसली. टॅक्सी चालकाने पुढे गेल्यानंतर आपला साथीदार सलमान शेख (२६) याला दादर या ठिकाणी आपल्या टॅक्सित बसवून घेतले.

हे ही वाचा:

भारत-कॅनडा वाद: पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनावर शशी थरूर यांची टीका

दहशतवादी घोषित करताच निज्जरला मिळाले होते नागरिकत्व

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर, ४५४ विरुद्ध २ मतांनी झाले संमत

शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !

पीडित मुलगी ही एकटी आणि गतिमंद असल्याचे निदर्शनास आल्यास दोघा नराधमांनी संधीचा फायदा उचलत धावत्या टॅक्सिमधून तिच्यावर अत्याचार करत बलात्कार केला.पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच आरोपी सलमान शेखसह टॅक्सी चालक श्रीप्रकाश पांडे या दोघांना अटक केली.महिलेवर बलात्कार आणि बाललैंगिक संरक्षण कायद्यांतर्गत या दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Exit mobile version