उत्तर प्रदेशातील अयोध्येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपी सलमानला अटक केली आहे. घटनेनंतर आरोपी सलमान गावातून पळून गेला होता. पोलिसांनी तपास सुरु केला असता आरोपी आलापूर जवळ असल्याची माहिती मिळाली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी जाळे टाकले असता आरोपीकडे बंदूक असल्याने त्याने पोलिसांवर गोळीबार सुरु केला. या चकमकीत आरोपीच्या पायाला गोळी लागली आणि अन त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत चार वर्षीय मुलगी ही आरोपी सलमानच्या शेजारील आहे. शेजारी राहणारी चार वर्षांची मुलगी अनेकदा आरोपीच्या एक वर्षाच्या मुलीसोबत खेळायची. याच चार वर्षांच्या मुलीवर सलमानने बलात्कार केला. दरम्यान, पीडित मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अयोध्या पोलिसांनी सांगितले की, जेव्हा पोलिस आरोपीच्या शोधात आले तेव्हा सलमानने गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला आणि त्याच्या पायाला गोळी लागली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, तिघांचा मृत्यू, सुमारे २०,००० लोक स्थलांतरित !
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात २५ हजार कोटींच्या उलाढालीचे थर
भाजपमध्ये प्रवेश करणार चंपाई सोरेन, दिल्लीमध्ये अमित शहांची घेतली भेट !
बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा