मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील एका पोलीस इन्स्पेक्टरवर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. इन्स्पेक्टरने लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला असून कांदिवली पूर्व समता नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोलीस इन्स्पेक्टर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नौशाद पाशा पठाण असे या पोलीस इन्स्पेक्टरचे नाव आहे. ३८ वर्षीय नौशाद पाशा पठाण याने पोईसर येथील एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे आरोप पीडित महिलेने केला आहे. मागील ३ वर्षांपासून पीडित महिलेसोबत इन्स्पेक्टर पठाण यांचे संबंध होते.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंचा नारा म्हणजे, ‘मी अहंकारी, माझे कुटुंब माझी जबाबदारी’
संदेशखळी परिसरात मोठ्या प्रमाणावर जमिनी बळकावल्या
ब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी
ढाक्यात सातमजली इमारतीला आग; ४३ जणांचा मृत्यू
या काळात पीडित महिला दोन वेळा गर्भवती राहिल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस इन्स्पेक्टर नौशाद पठाण यांनी कोविड-१९ महामारीच्या काळात मदत करण्याच्या नावाखाली महिलेशी संपर्क साधला होता, अशी माहिती समोर आली आहे. मार्च २०२० ते २०२३ या कालावधीत त्याने महिलेसोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. सध्या संशयित आरोपी पोलीस इन्स्पेक्टर नौशाद पठाण हे नांदेड, येथे तैनात आहेत.समता नगर पोलिसांनी आरोपी पोलिस इन्स्पेक्टर नौशाद पाशा पठाण विरुद्ध भा.द.वि. कलम ३७६ (२)(एन), ४१७, ३२३ आणि ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.