पुराव्यांशी छेडछाड कराल तर याद राखा, म्हणत आसाराम बापूला ‘वैद्यकीय जामीन’

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

पुराव्यांशी छेडछाड कराल तर याद राखा, म्हणत आसाराम बापूला ‘वैद्यकीय जामीन’

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला आसाराम बापू याला सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करताना ८५ वर्षीय आसाराम बापूला पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देश दिले आहेत.

आसाराम बापूवर सध्या जोधपूरच्या आरोग्य मेडिकल सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. जोधपूर मध्यवर्ती कारागृहात आसाराम शिक्षा भोगत असून यापूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्या जामीनाच्या कालावधीत देखरेखीसाठी सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

यापूर्वी २०२४ च्या ऑगस्ट महिन्यात राजस्थान उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट रोजी आसाराम बापूला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत महाराष्ट्रातील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली होती. तब्बल ११ वर्षांनंतर मंगळवारी जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून आसाराम बापू बाहेर आला होता. गेल्या ११ वर्षांपासून आसाराम बापू लैंगिक अत्याचार आणि शोषणाच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. आसारामने याआधी अनेकदा पॅरोल मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र, त्याला न्यायालयाने पॅरोल मंजूर केला नाही.जोधपूरच्या एम्स रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर हा पॅरोल मंजूर केला गेला.

हे ही वाचा..

इंटरपोलप्रमाणे भारताचा आता ‘भारतपोल’; नवे पोर्टल कसे करणार काम?

नागपुरात एचएमपीव्हीची दोन मुलांना लागण

समाजसुधारक वाल्मिक कराडची पाच वाइनची दुकाने, प्रत्येक दुकानाचा बाजार भाव ५ कोटीच्या घरात!

इंडोनेशिया BRICS चा नवा सदस्य!

गांधीनगर सत्र न्यायालयाने फेब्रुवारी २०२३ मध्ये आसुमल हरपलानी म्हणजेच आसाराम बापू याला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. बलात्काराच्या प्रकरणात आसाराम बापूची ही दुसरी शिक्षा होती. यापूर्वी, एप्रिल २०१८ मध्ये राजस्थानमधील जोधपूरच्या आश्रमात एका १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आले होते. २०१३ मध्ये आसाराम बापूवर जोधपूर आणि गांधीनगर येथे बलात्काराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Exit mobile version