25 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरक्राईमनामाबलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला पोलीस कोठडी

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाला पोलीस कोठडी

बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर केली होती अटक

Google News Follow

Related

कर्नाटकातील हासन मतदारसंघातील खासदार प्रज्वल रेवण्णा याला बलात्कार आणि लैंगिक शोषण संदर्भात शुक्रवार, ३१ मे रोजी अटक करण्यात आली. बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो जर्मनीहून दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी त्याला पहाटेचं अटक केली. यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बेंगळुरू न्यायालयाने शुक्रवारी बलात्काराचा आरोपी कर्नाटकचे खासदार आणि माजी जनता दल सेक्युलर (जेडीएस) नेते प्रज्वल रेवण्णा याला ६ जूनपर्यंत विशेष तपास पथक (एसआयटी) कोठडी सुनावली आहे. प्रज्वल रेवण्णा जर्मनीहून भारतात येत असल्याचे कळताच कर्नाटक पोलिस, बेंगळुरू पोलिस आणि इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याच्या अटकेची तयारी केली होती. अटक होताच विशेष तपास पथकाने त्याला कोठडीत नेले. एप्रिल २७ ला रेवण्णाने भारत सोडला होता. हासन येथील लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यावर तो रवाना झाला होता.

शुक्रवारी मध्यरात्री १२.४९ वाजता प्रज्ज्वल बेंगळुरू विमानतळावर दाखल झाला. शुक्रवारी ३१ मे रोजी आपण १० वाजता विशेष तपास पथकासमोर उपस्थित असू असे त्याने म्हटले होते. बुधवारी त्याने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने त्याची सुनावणी शुक्रवारपर्यंत पुढे ढकलली.

हे ही वाचा:

बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णा भारतात आला; तात्काळ केली अटक

मोदींसोबत, केतकरांनाही हॅट्रीकची संधी…

…आणि अचानक मनमोहन सिंग जागे झाले!

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू!

आक्षेपार्ह व्हिडिओ शेअर झाल्यानंतर प्रज्ज्वलविरोधात कर्नाटक सरकारने २८ एप्रिलला एसआयटी नियुक्त केली. या व्हिडिओमध्ये त्याने महिलांवर अत्याचार केल्याचे दिसत आहे. एसआयटी त्याच्याविरोधातील तीन प्रकरणांचा तपास करणार आहे. दरम्यान, प्रज्वल रेवण्णाला त्यांचे आजोबा देवेगौडांनीही पत्र लिहून इशारा दिला होता. देवेगौडा यांनी प्रज्वल रेवण्णा याला लवकरात लवकर भारतात परतण्याचा इशारा दिला. देवेगौडांनी एक्सवर पोस्ट करून लिहिलं होतं की, “मी प्रज्वल रेवण्णा याला इशारा देतो, तो जिथे कुठे असेल, तिथून त्याने लवकरात लवकर भारतात परत यावे आणि येथील कायदेशीर प्रक्रिया सामोरे जावे. त्याने माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नये.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा