पत्रकार राणा आयुब यांच्यावर ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. लोकहिताचे प्रकल्प करत असल्याचे भासवत सर्वसामान्य लोकांकडून पैसे गोळा करून ते वैयक्तीत खात्यात वळवल्याचा आरोप ईडीने राणा आयुबवर केला आहे. तसेच राणा आयुब हिच्याविरोधात विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. आतापर्यंत राणाच्या बॅंक खात्यातील एक कोटी ७७ लाख रुपयांची रक्कमदेखील ईडीने जप्त केली आहे.
हिंदू आयटी सेलचे संस्थापक विकास सांकृत्यायन यांनी राणा आयुब त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणी राणा यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे राणा आयुबने २ कोटी ६९ लाख रुपये उभारले आहेत. ईडीकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, राणा अयुब यांनी २०२०-२१ मध्ये ऑनलाइन क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून चॅरिटीसाठी २ कोटी ६९ लाख रुपये उभे केले होते. त्या वेळी राणा आयुब यांनी म्हटले होते की संपूर्ण देणगीचा हिशोब झाला असून एका पैशाचाही गैरवापर झालेला नाही.
सन २०२० मध्ये राणाने कोविड काळात महाराष्ट्र,आसाम, बिहार येथे झोपडपट्टीत राहणा-या लोकांना मदत करणे, तसेच अन्य काही समाजहिताची कारणे दाखवत केट्टो या ऑनलाइन प्लॅटफाॅर्मद्वारे सर्वसामान्य माणसांकडून मोठ्या प्रमाणात पैसा गोळा केला होता. केट्टोच्या माध्यमातून २ कोटी ६९ लाख ४४ हजार ६८० रुपये जमा झाले आहे. ही रक्कम राणा यांचे वडील आणि बहिणीच्या खात्यात ट्रान्सफर केली होती. यानंतर संपूर्ण रक्कम राणाच्या खात्यातच ट्रान्सफर झाली. अयुबने ईडीला केवळ ३१ लाख रुपयांच्या खर्चाचा तपशील दिला आहे. तसेच कागदपत्रांची छाननी केल्यानंतर निधीतून केवळ १७ लाख ६६ हजार लाख रुपये खर्च झाल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
आमिरवर जाहिरातीतून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
चीनमध्ये शी जिनपिंग यांच्या विरोधात बॅनर झळकले
काश्मीर मुद्द्यावर टिपण्णी करणाऱ्या पाकिस्तानला भारताने फटकारले
मुंबई, दिल्लीत दहशतवादविरोधी बैठक
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, राणा आयुबने पैशाचा वैयक्तिक वापर केला आहे. तिच्या खासगी ट्रॅव्हल्ससाठी झालेला खर्च मदतकार्यासाठी कळवण्यात आला. तपासात हे स्पष्ट झाले आहे की राणा अयुबने धर्मादायतेच्या नावावर सुनियोजित आणि पद्धतशीरपणे निधी उभारला होता, परंतु हा निधी धर्मादाय कार्यासाठी पूर्णपणे वापरला गेला नाही. राणा अयुब यांनी निधीपैकी ५० लाख रुपये मुदत ठेवींमध्ये जमा केले आणि ते मदत कार्यासाठी वापरले नाहीत.