रामेश्वरम कॅफे स्फोट; भाजप कार्यकर्ता असलेल्या साक्षीदाराला संशयित म्हणून संबोधले; एनआयएकडून वृत्ताचे खंडन

साई प्रसाद मुख्य संशयित नसून एकमेव साक्षीदार असल्याचे स्पष्टीकरण

रामेश्वरम कॅफे स्फोट; भाजप कार्यकर्ता असलेल्या साक्षीदाराला संशयित म्हणून संबोधले; एनआयएकडून वृत्ताचे खंडन

रामेश्वरम कॅफे स्फोटाप्रकरणी प्रसारमाध्यमांनी भाजप कार्यकर्ता असणाऱ्या साक्षीदार साई प्रसाद याला मुख्य संशयित म्हणून संबोधले होते. काँग्रेस मीडिया वॉरिअर्सने या संदर्भातील वृत्त दिले होते. मात्र साई प्रसाद मुख्य संशयित नसून एकमेव साक्षीदार असल्याचे स्पष्टीकरण एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने दिले आहे.

सोशल मीडियावर या संदर्भातील वृत्त व्हायरल झाले होते. स्फोटातील मुख्य संशयित साईप्रसाद हा भाजपचा कार्यकर्ता असल्याचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर एनआयएने हा खुलासा केला आहे. हे वृत्त खोटे असल्याचा दावा एनआयएने केला आहे.
प्रसाद याचे सेकंड हँड मोबाइल फोनचे छोटे दुकान असून तो रंगारी म्हणूनही काम करतो. एक छोटेसे दुकान चालवतात आणि पेंटर म्हणून अर्धवेळ काम करतात.

बॉम्बस्फोट करणाऱ्या आरोपीने प्रसादच्या दुकानातून मोबाईल फोन किंवा सिमकार्ड घेतले असावे, असा अंदाज आहे. संशयित राहात असलेल्या निवासस्थानाची रंगरंगोटी करण्यात प्रसादचा सहभाग असू शकतो. याबाबत अधिक तपास करण्यासाठी एनआयएचे पथक कॉलेजमधील मित्रांसह परिचितांना बोलावून त्यांची तपासणी करत आहेत.

गेल्या आठवड्यात, एनआयएने शिवमोग्गा येथील अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन या दोन संशयितांच्या घरांवर तसेच मोबाईल स्टोअरवर छापे टाकले. २८ मार्च रोजी आणखी एक प्रमुख संशयित मुझम्मिल शरीफ याच्या अटकेनंतर आणि त्याच्या चौकशीनंतर हे छापे टाकण्यात आले. छाप्यांदरम्यान असे आढळून आले की, मुजम्मिलने मुसावीर आणि ताहा यांच्याशी संपर्क साधण्यासाठी वापरलेला फोन मूळचा साई प्रसाद नावाच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्याचा होता.

हे ही वाचा:

फलंदाजांच्या शरणागतीमुळे चेन्नईचा पराभव

इराणी वाणिज्य दूतावासावरील हल्ल्यामुळे मध्य पूर्वेकडील परिस्थिती आणखी चिघळण्याची भीती

बलुचिस्तानमधून महिन्याभरात २२ जणांचे अपहरण

पाकिस्तान लष्कराकडून पत्नीवर विषप्रयोग; इम्रान खान यांचा आरोप

अधिक चौकशी केल्यावर असे उघड झाले की, साईप्रसादने त्याचा जुना फोन एका मोबाईल शॉपी मालकाला विकला होता, त्याने तो मुझम्मिलला विकला होता. या दरम्यान एनआयएने चालू तपासाशी संबंधित खोटी माहिती प्रसारित केल्याबद्दल कठोर निषेध जारी केला आहे. तपासाच्या प्रगतीत अडथळा आणणाऱ्या निराधार अफवा पसरवू नये, असे आवाहन एनआयएने केले आहे.

Exit mobile version