डेरा सच्चा सौदाच्या गुरमित रामराहीमचा जन्म जाणार तुरुंगात

डेरा सच्चा सौदाच्या गुरमित रामराहीमचा जन्म जाणार तुरुंगात

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंह आणि इतर चार जणांना जवळपास दोन दशकांपूर्वी व्यवस्थापक रणजीत सिंह यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

कृष्ण लाल, जसबीर सिंग, अवतार सिंग आणि सबदिल अशी इतर चार जणांची नावे आहेत. तसेच राम रहीमला ३१ लाखांचा दंड भरायला सांगितला आहे. इतर दोषींनाही दंड भरावा लागणार आहे. अब्दिलला १.५ लाख रुपये, कृष्णन आणि जसबीर यांना प्रत्येकी १.२५ लाख रुपये आणि अवतारला ७५ हजार रुपये भरावे लागतील असे सांगण्यात आले आहे.

यातील पन्नास टक्के रक्कम रणजीत सिंग यांच्या कुटुंबाला जाईल. या प्रकरणातील सहाव्या आरोपीचा वर्षभरापूर्वी मृत्यू झाला. या महिन्याच्या सुरुवातीला हरियाणाच्या पंचकुला येथील विशेष सीबीआय न्यायालयाने पाचही आरोपींना दोषी ठरवले होते.

दोन अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी २०१७ साली शिक्षा झाल्यापासून रोहतक जिल्ह्यातील सुनारिया कारागृहात बंद असलेला राम रहीम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर झाला, तर इतर आरोपी न्यायालयात उपस्थित होते.

हे ही वाचा:

उदय सामंत, गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत का?

काँग्रेसच्या बैठकीत सरदार पटेल यांचा पुन्हा अपमान

काय आहे इस्रायमधल्या ‘मायबोली’ मराठी मासिकाची कथा?

ठाकरे सरकार म्हणजे, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’

रणजीत सिंह, जे व्यवस्थापक होते आणि पंथाचे अनुयायी होते, त्यांची २००२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राम रहीमकडून महिलांचे लैंगिक शोषण कसे केले जाते हे सांगणाऱ्या एका निनावी पत्राचा प्रसार करण्यातील त्याच्या संशयास्पद भूमिकेमुळे त्यांची हत्या करण्यात आली. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार राम रहीमने नंतर त्याला मारण्याचा कट रचला.

Exit mobile version