अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खान दुर्रानी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सोमवारी ओशिवरा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. राखी सावंतने त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर दुर्रानी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी ओशिवरा पोलिस ठाण्यात सुरू आहे.
सोमवारी राखी सावंतने पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर नोंदविताना त्यात म्हटले की, आदिलने राखी सावंतच्या संपत्तीचा गैरवापर केला. बिग बॉसमध्ये सहभागी झालेले असताना आपल्या पैशांचा गैरवापर आदिलने केला असा राखीचा आरोप आहे. त्याशिवाय, आदिल हाच आपल्या आईच्या मृत्यूस कारणीभूत आहे, असेही तिने म्हटले आहे. तिची आई २९ जानेवारी रोजी कर्करोगामुळे मृत्युमुखी पडली. तिच्या मृत्यूस आदिल जबाबदार आहे, अशी राखीची तक्रार आहे. आईवरील शस्त्रक्रियेसाठी त्याने वेळेवर पैसे दिले नाहीत.
हे ही वाचा:
कॉपीमुक्त परीक्षांसाठी राज्य परीक्षा मंडळाचा कठोर निर्णय
तूर्की,सीरिया भूकंपातील मृतांचा आकडा ४,००० पेक्षा अधिक
भूकंपग्रस्त तूर्कीला मदत करण्यासाठी भारत धावला
वांगी शेतीची यशोगाथा, कल भी, आज भी….
राखी सावंतने सोशल मीडियामध्ये आपले म्हणणे मांडले आहे. त्यात ती म्हणते की आदिलने माझे आयुष्य बरबाद केले. मला त्याने मारले आहे, माझे पैसे लुटले आहेत. त्याने माझी फसवणूक केली आहे. त्याने जरी कुराणवर हात ठेवून सांगितले की, त्याने पैसे चोरले नाहीत तरी त्यावर विश्वास ठेवता येणार नाही. आपण यासंदर्भातील सर्व पुरावे सादर केलेले आहेत.
राखीने असेही म्हटले आहे की, आदिलचे विवाहबाह्य संबंध आहेत. आपण त्याच्या या मैत्रिणीचे नाव नुकतेच जाहीर केले आहे. सोमवारी राखी आणि आदिल एका व्हीडिओमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यात आदिल राखीला भरवत असताना दिसत आहे. त्यानंतर तिने सोशल मीडियावर म्हटले की, तो माझी माफी मागण्यासाठी आला होता पण मी त्याला कधीही माफ करणार नाही.